११ हजारांवर मजुरांना ‘रोजगार हमी’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:19 IST2021-08-23T04:19:43+5:302021-08-23T04:19:43+5:30

विजयकुमार सैतवाल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या संकटात अनेक व्यवहार ठप्प झाल्याने बहुतांश जणांच्या हाताला काम नसताना उन्हाळ्यापासून ...

Aadhaar of 'Employment Guarantee' for 11,000 workers | ११ हजारांवर मजुरांना ‘रोजगार हमी’चा आधार

११ हजारांवर मजुरांना ‘रोजगार हमी’चा आधार

विजयकुमार सैतवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या संकटात अनेक व्यवहार ठप्प झाल्याने बहुतांश जणांच्या हाताला काम नसताना उन्हाळ्यापासून ते आतापर्यंतदेखील रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांची संख्या वाढत असून या ठिकाणी सुरू असलेल्या कामामुळे त्यांना आधार मिळत आहे. जिल्ह्यातील ११ हजार ४१२ मजुरांच्या हाताला काम मिळवून त्यांना स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात मजुरांची संख्या वाढत गेली व ती आता १२ हजारांच्या दिशेने जात आहे.

कोरोनाचा संसर्ग उद्भवल्यानंतर ब्रेक द चेनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद आहेत. त्यामुळे घर कसे चालवावे, असे संकट सर्वांसमोर उभे आहे. यात ग्रामीण भागात तर शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र उन्हाळ्यामध्ये शेतीतदेखील जास्त कामे नसल्याने अनेकांकडे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. यात अनेक मजुरांनी रोजगार हमी योजनेकडे धाव घेतली. विशेष म्हणजे गेल्या वर्षी कोरोनाचे संकट ओढवले तेव्हापासून रोजगार हमी योजनेच्या कामावर मजुरांची संख्या वाढतच आहे. यात गेल्या वर्षभरातील प्रत्येक महिन्याची सरासरी पाहिली असता किमान आठ हजार मजूर तरी जिल्हाभरात वेगवेगळ्या कामाच्या ठिकाणी होते. विशेष म्हणजे मे २०२० मध्ये कडक लॉकडाऊनच्या काळात मजुरांची संख्या नऊ हजार ५००च्या पुढे गेली होती. उन्हाळ्यानंतर पावसाळ्यात शेतीमध्ये कामे सुरू झाली तरी संख्या वाढतच जाऊन आता ऑगस्ट महिन्यापर्यंत ही संख्या ११ हजार ४१२ पर्यंत पोहोचली आहे.

जिल्ह्यात १७२९ कामे सुरू

जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये एकूण एक हजार ७२९ कामे सुरू आहेत. रोजगार हमी योजनेअंतर्गत सध्या विहिरी, गुरांचा गोठा, शेड उभारणे, जिल्हा परिषदेच्या शाळांना कुंपण भिंतीचे काम, विहिरींचे काम, शेतीच्या बांधावर वृक्ष लागवड, शोष खड्डे असे काम सुरू आहे.

गेल्या वर्षी व या वर्षाची मजुरांची संख्या

३१ जुलै २०२० - ८४७१

३१ मार्च २०२१ - ७१२२

१९ एप्रिल २०२१- ७९००

जून २०२१ - ७९००

ऑगस्ट २०२१ - ११४१२

तालुकानिहाय कामावर असलेल्या मजुरांची संख्या (१९ एप्रिल)

तालुका - मजूर संख्या

अमळनेर - ५१३

भडगाव ४८८

भुसावळ १८९

बोदवड ३७१

चाळीसगाव १४९८

चोपडा ५६५

धरणगाव ३०१

एरंडोल ३६५

जळगाव २०२

जामनेर ९४६

मुक्ताईनगर ६१०

पाचोरा ४६४

पारोळा ४००७

रावेर ३९०

यावल ५०३

एकूण ११४१२

Web Title: Aadhaar of 'Employment Guarantee' for 11,000 workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.