दिव्यांगांना दिला जात आहे प्रमाणपत्राचा ‘आधार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:18 IST2021-09-14T04:18:54+5:302021-09-14T04:18:54+5:30
मुक्ताईनगर : तालुक्यातील कुऱ्हा-वडोदा जिल्हा परिषद गटात सुवर्ण सप्ताहाच्या निमित्ताने शिवसेनेतर्फे दिव्यांग बांधवांना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र स्वखर्चाने वाटप करण्याच्या ...

दिव्यांगांना दिला जात आहे प्रमाणपत्राचा ‘आधार’
मुक्ताईनगर : तालुक्यातील कुऱ्हा-वडोदा जिल्हा परिषद गटात सुवर्ण सप्ताहाच्या निमित्ताने शिवसेनेतर्फे दिव्यांग बांधवांना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र स्वखर्चाने वाटप करण्याच्या कार्यक्रमाचा प्रारंभ आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला. साप्ताहात दिव्यांग बांधवांचे अर्ज ऑनलाइन करून देणे ते जळगाव नेत टोकण आणणे व मिळालेले तारखेला सर्व बांधवांना जळगाव घेऊन जाणे अशी कामे केली जाणार असून, त्यासाठी लागणारा सर्व खर्च शिवसेना करणार आहे. त्यापुढेही सर्व योजना व सर्व लाभ मिळवून दिले जाणार आहे. याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः छगन बोदडे (काकोडा) यांचा अर्ज ऑनलाईन भरत प्रिंट देऊन शुभारंभ केला.
या सुवर्ण सप्ताहांतर्गत हलखेडा गावांमध्ये आदिवासी तीनशे महिलांना साड्या वाटपही केल्या. शिवसेना व युवासेना कुऱ्हा-वडोदा यांच्यातर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला.
या वेळी युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, उपतालुका प्रमुख नवनीत पाटील, नितीन कांडेलकर, काशिनाथ वानखेडे तसेच सर्व सरपंच व उपसरपंच, पुंडलिक सरक, विभागप्रमुख विनोद पाटील, गण प्रमुख नारायण पाटील, कुरबन तडवी, पंकज पांडव, छगन कदम, सतीश नागरे, अकबर ठेकेदार, अविनाश वाढे, दीपक वाघसर, दिलीप भोलाणकर, रशिद तडवी, बाळू पाटील, ज्ञानेश्वर पाटील, शैलेश पाटील, विष्णू भाऊ, संदीप डिवरे, श्रावण धाडे, नितीन कासार, राहुल खिराळकर, पंकज धाबे, योगेश मुळक, सोपान तलवारे, इम्रान खान व सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.
कुऱ्हा-वडोदा गटात ऑनलाइन प्रमाणपत्र अर्जाची प्रत देताना चंद्रकांत पाटील. सोबत नवनीत पाटील, पंकज राणे, नितीन कांडेलकर आदी (छाया : विनायक वाडेकर)