शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

शहिदांच्या कुटुंबीयांना जळगावातून मदतीचा हात, आर्या फाऊंडेशनचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 15:38 IST

देशाच्या संरक्षणासाठी जिवाची बाजी लावणारे जवान शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबांना आधार मिळावा म्हणून जळगावातून मदतीचा हात दिला जात आहे.

- विजयकुमार सैतवालजळगाव : देशाच्या संरक्षणासाठी जिवाची बाजी लावणारे जवान शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबांना आधार मिळावा म्हणून जळगावातून मदतीचा हात दिला जात असून, दीड वर्षात राज्यातील ठिकठिकाणच्या १० शहिदांच्या कुटुंबीयांना आर्या फाऊंडेशनच्या वतीने मदत करण्यात आली आहे. यात आता ७ आॅगस्ट रोजी काश्मिरात शहीद झालेल्या कौस्तुभ प्रकाशकुमार राणे या शहीद जवानाच्या कुटुंबीयांना ६५ हजारांचा धनादेश देण्यात येणार आहे.देशवासीय सुरक्षित राहावे म्हणून भारतीय सैनिक देशाच्या वेगवेगळ्या भागातील सीमांवर रात्रं-दिवस जीवाची बाजी लावून पहारा देत असतात. यात त्यांना वीरमरणही येते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आधार मिळावा या भावनेने जळगावातील आर्या फाऊंडेशन ही संस्था सरसावली असून, शहीद कुटुंबीयांना मदत म्हणून ६५ हजार रुपयांची मदत करीत आहे.राणे कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न७ आॅगस्ट रोजी पहाटे उत्तर काश्मीमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना मीरा रोड (ठाणे) येथील रहिवासी असलेले कौस्तुभ प्रकाशकुमार राणे यांना वीरमरण आले. त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी आर्या फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले. त्या वेळी दीडच दिवसात ६५ हजार रुपये जमा झाले व त्याचा धनादेश तयार करून डॉ. पाटील यांनी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. त्यानुसार हे पदाधिकारी शहिद कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करणार आहेत.यांना केली मदतसंदीप सोमनाथ ठोक (खंडागळी, जि. नाशिक), विकास कुळमुथे (नेरळ, जि. यवतमाळ), विकास उईके (नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती), चंद्रकांत गलंडे (जाशी, ता. माण, जि. सातारा), नितीन सुभाष कोळी (दुधगाव, ता. मिरज), सुमेध वामन गवई (लोणाग्रा, जि. अकोला), रवींद्र धनावडे (मोहटमेळा, जि. सातारा), मिलिंद किशोर खैरनार (म्हसरुळ, जि. नाशिक), योगेश मुरलीधर भदाणे (खलाणे, जि. धुळे), कौस्तूभ राणे (मिरा रोड, ठाणे) या शहिदांच्या कुटुंबीयांना फाउंडेशनच्यावतीने मदत करण्यात आली आहे.राज्याच्या काना-कोप-यात पोहोचली मदतगेल्या दीड वर्षांपासून फाउंडेशनच्यावतीने ही मदत केली जात असून आता पर्यंत राज्यातील नाशिक, अमरावती, यवतमाळ, अकोला, नंदुरबार, शिंदखेडा इत्यादी ठिकाणच्या शहीद कुटुंबीयांच्या मदत करण्यात आली आहे.आवाहनाला दात्यांचा प्रतिसादकोणत्याही भागात जवान शहीद झाल्यानंतर ही भर कधीही निघू शकत नाही, मात्र शहिदांच्या कुटुंबीयांना आधार मिळावा म्हणून डॉ. धर्मेंद्र पाटील हे शहीद जवानाचे छायाचित्र व मदतीविषयीचा संदेश सोशल मीडियावर पाठवितात. त्यानुसार त्याला प्रतिसाद देत दाते सढळ हाताने मदत करीत असल्याचा सुखद अनुभव फाऊंडेशनला येत असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. स्वखर्चाने पोहोचतात पदाधिकारी राज्यात आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी मदतीसाठी जावे लागले त्या ठिकाणी फाऊंडेशनचे पदाधिकारी हे स्वखर्चाने पोहोचतात, हे विशेष.देशासाठी जिवाची बाजी लावणारे जवान शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, या उद्देशाने आपण ही मदत देत असतो.- डॉ. धर्मेंद्र पाटील, अध्यक्ष, आर्या फाउंडेशन, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव