शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
2
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
3
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
4
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
5
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
6
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
7
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
8
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
9
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...
10
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
11
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
12
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
13
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार
14
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
15
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
16
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
17
बिरोबाचे दर्शन घेऊन निघाले, हल्लेखोरांनी पतीच्या पाठीत सत्तूरने केला वार; पत्नीचे मंगळसूत्र घेऊन पळाले
18
कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड
19
बाजारात तेजीचा डबल धमाका! सेन्सेक्सची ८६२ अंकांची उडी; गुंतवणूकदारांनी कमावले २.०९ लाख कोटी
20
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ

जळगाव विमानतळावर प्रशिक्षण विमान उड्डाण घेतांना धावपट्टीवरून घसरले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 20:44 IST

भूषण श्रीखंडे जळगाव : जळगाव विमानतळावरील ‘न्यू फ्लाइंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षणार्थी विमान बुधवारी दुपारी दीड वाजता धावपट्टीवर ...

भूषण श्रीखंडे

जळगाव : जळगाव विमानतळावरील ‘न्यू फ्लाइंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षणार्थी विमान बुधवारी दुपारी दीड वाजता धावपट्टीवर उड्डाण घेत असताना विमानाचा पुढील बाजूचा लँडिंग गियर निखळल्याने विमान धावपट्टीवर घसरून अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेत विमानाच्या पुढील भागाचे नुकसान झाले असून सुदैवाने त्यात कोणी जखमी झाले नसल्याची माहिती समोर येत आहे. जळगाव विमानतळावर हा पहिला अपघात झाला आहे.

जळगाव विमानतळावर ‘न्यू फ्लाइंग ट्रेनिंग इन्सिट्यूट’ प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विमान प्रशिक्षण दिले जाते. बुधवार (दि. १९) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे व्हीटी-एलएवाय हे विमान धावपट्टीवरून उड्डाण घेत असताना विमानाच्या पुढील बाजूला असलेला लँडिंग गियर निखळल्याने हे विमान धावपट्टीवर आदळले. वीस ते तीस फूट अंतरापर्यंत विमान धावपट्टीवर घसरत गेले. या घटनेमुळे विमानतळावरील सुरक्षा यंत्रणाची एकच धावपळ उडाली. या घटनेत विमानातील प्रशिक्षणार्थी पायलट सुखरूप असल्याचे समजते.

धावपट्टीचे किरकोळ नुकसान

या अपघातात विमान धावपट्टीवर आदळले. त्यामुळे धावपट्टीवर एका ठिकाणी खड्डा पडला आहे तर वीस ते तीस फूट विमान धावपट्टीवर घसरत गेल्याने धावपट्टीचे किरकोळ नुकसान झाले. 

टॅग्स :Accidentअपघात