शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! जेलमध्ये एका कैद्यावर चौघांकडून लैंगिक अत्याचार; चार बंदीविरुद्ध गुन्हा दाखल

By ajay.patil | Updated: July 26, 2023 18:23 IST

या प्रकरणी चार बंदीविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव: जिल्हा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यासाठी अटकेत असलेल्या एका बंदीवर त्याच्या बॅरेकमध्ये असलेल्या इतर बंदीनी अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच या बंदीच्या गळ्यावर धारदार पट्टीने वार करत, या घटनेची माहिती दिल्यास बंदीला जीवे ठार मारण्याचीही धमकी दिली आहे. या प्रकरणी चार बंदीविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा कारागृहात गेल्या काही महिन्यांपासून एका खुनाच्या गुन्ह्यात एक २६ वर्षीय संशयित आरोपी युवकाला ठेवण्यात आले आहे. तो युवक असलेल्या कारागृहातील १ व २ बॅरेकध्ये भावेश कांतीलाल दंडगव्हाळ, विकी शिंदे, कलीम शेख सलीम व विजय ऊर्फ राणा दिलीप चव्हाण या बंदींनीदेखील ठेवण्यात आले होते. १२ जुलै रोजी २६ वर्षीय बंदी असलेल्या युवकाला बाथरूममध्ये घेऊन जात त्याच्यावर बळजबरीने अनैसर्गिक कृत्य केले. तसेच त्याला याबाबत वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

नकार दिल्याने लोखंडी पट्टीने केले गळ्यावर वाररात्री चार बंदींनी अनैसर्गिक कृत्य केल्यानंतर, त्याच दिवशी पहाटे पुन्हा तो युवक झोपलेला असताना, विकी शिंदे या बंदीने त्याला उठवित त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या बंदीने त्याला नकार दिला. त्यानंतर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. मात्र, तरीही नकार दिल्यामुळे इतर चार बंदींनी त्या युवकाच्या गळ्यावर लोखंडी पट्टीने वार करत, त्याला जखमी केले. त्यानंतर घाबरून तो युवक गळ्याला कापड लावून झोपून गेला. २० जुलैला झालेल्या घटनेची माहिती इतर बंदींनी दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. जिल्हा कारागृह प्रशासनाकडून त्या पीडित बंदीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, या प्रकरणी भावेश कांतीलाल दंडगव्हाळ, विकी शिंदे, कलीम शेख सलीम, विजय उर्फ राणा दिलीप चव्हाण यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक उल्हास चऱ्हाटे हे करीत आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारीjailतुरुंग