शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरगावाहून घरी परतल्यानंतर मध्यरात्री शेतमजूराने संपविली जीवनयात्रा; खेडी-कढोली येथील घटना

By सागर दुबे | Updated: May 4, 2023 13:56 IST

घरामागे दिसला रहिवाशांना मृतदेह

जळगाव : अमळनेर येथून घरी परतल्यानंतर खेडी-कढोली (ता.एरंडोल) येथील ज्ञानेश्वर रमेश कोळी (३५) या शेतमजूराने बुधवारी मध्यरात्री विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सकाळी ७ वाजता रहिवाशांना घरामागे कोळी यांचा मृतदेह दिसून आल्यानंतर उघडकीस आली. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजून आलेले नसून या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ज्ञानेश्वर कोळी हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होते. शालकाच्या मुलीच्या लग्नानिमित्त कोळी हे कुटूंबियांसह अमळनेर येथे गेले होते. बुधवारी रात्री ९ वाजता ते एकटेच खेडी-कढोली येथे परत आले. पत्नी आणि दोन्ही मुले अमळनेर येथे थांबले होते. मध्यरात्री कोळी यांना विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. गुरूवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शेजारच्यांना कोळी हे त्यांच्या घरामागे मृतावस्थेत दिसून आले. ही माहिती बाब त्यांनी त्यांच्या कुटूंबियांना सांगितली. त्यानंतर ग्रामस्थ व नागरिकांच्या मदतीने कोळी यांचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणण्यात आला. याठिकाणी वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना तपासणीअंती मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात असून शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आला होता.

टॅग्स :JalgaonजळगावDeathमृत्यू