शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत बैल जोडी ठार; वाळू माफियांसह पोलीस प्रशासनाविरोधात ग्रामस्थांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 16:49 IST

तालुक्यातील आव्हाणे रस्त्यालगत उभ्या असलेल्या बैलगाडीला जळगावकडून येणाऱ्या वाळूच्या ट्रॅक्टरने दिलेल्या जोरदार धडकेत, दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना

जळगाव :

तालुक्यातील आव्हाणे रस्त्यालगत उभ्या असलेल्या बैलगाडीला जळगावकडून येणाऱ्या वाळूच्या ट्रॅक्टरने दिलेल्या जोरदार धडकेत, दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता घडली. गरीब शेतकऱ्याची जोडी वाळूच्या ट्रॅक्टरच्या धडकेत ठार झाल्यानंतर संतप्त आव्हाणे ग्रामस्थांनी कानळदा रस्त्यालगत काही काळ रास्तारोको केला. तसेच जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.बऱ्याच वेळ सुरु असलेल्या गोंधळानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. शुक्रवारी सकाळी ९ वाजता आव्हाणे येथील दगडू धनगर हे मुलगा रावसाहेब धनगर यांच्यासोबत शेतातील पिकांना खतं देण्यासाठी बैलगाडीने रासायनिक खते घेऊन शेतात आले होते.

बैलगाडी रस्त्याच्या कडेला उभी करून, दोन्ही बाप-लेकं बैलगाडीत ठेवलेल्या खतांच्या गोण्या उतरवत होते. सकाळी ९.३० वाजता, रस्त्याच्या बाजुला उभी असलेल्या बैलगाडीला जळगावकडून गिरणा नदीत वाळू भरण्यासाठी भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॅक्टरने बैलगाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला.

टॅग्स :Jalgaonजळगाव