शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीसाठी जमावाचा पोलिस ठाण्यावर हल्ला, दोन पोलिस गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 23:10 IST

जामनेर : दगडफेकीत निरीक्षकासह १० कर्मचारी जखमी, पोलिसांचा हवेत गोळीबार

मोहन सारस्वत, लियाकत सय्यद

जामनेर  (जि. जळगाव)  : एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून करुन पसार झालेल्या सुभाष उमाजी भील (३५) या आरोपीला पकडण्यात आले. त्याला आमच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी जमलेल्या जमावाने जामनेर पोलिस ठाण्यावर हल्ला केला.  जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह १० पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. ही घटना गुरुवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घडली. 

पोलिसांनी अश्रुधाराच्या नळकांड्या फोडल्या. तरीही जमाव शांत होत नव्हता. जमावाच्या दगडफेकीत पोलिस ठाण्याच्या काचा फुटल्या.  तसेच संतप्त जमावाने एक दुचाकी जाळली तसेच अनेक वाहनांच्या काचा फोडल्या. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे काही वेळातच जामनेरात दाखल झाले. जमावाला आवर घालण्यासाठी ते स्वत: रस्त्यावर उतरले.  

जामनेरच्या घटनेत दोन पोलिस गंभीर जखमी पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. या दगडफेकीत रामदास कुंभार, हितेश महाजन, रमेश कुमावत, संजय राखुंडे, प्रीतम बरकले, संजय खंडारे, सुनील राठोड हे पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यापैकी रामदास कुंभार, रमेश कुमावत गंभीर जखमी आहेत. 

भुसावळातही लाठीचार्ज दरम्यान, आरोपीला भुसावळ येथून अटक करण्यात आली. त्याला ताब्यात द्यावे, म्हणून भुसावळ येथील नाहटा चौफुलीवरही जमाव जमला होता. या जमावाला पांगण्याविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी