शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मशिनरी बसविण्यासाठी येणाऱ्या मॅकेनिकलचा रेल्वेतून पडून मृत्यू

By विजय.सैतवाल | Updated: May 26, 2024 22:17 IST

दोन सहकारी रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर उघड झाली घटना

जळगाव: जळगाव येथे औद्योगिक वसाहत परिसरातील एका कंपनीत मशिनरी फिटिंगसाठी येणाऱ्या इर्शाद मेहबूब (३०, रा. बाबुली,  जि. पानिपत, हरियाणा) या मॅकेनिकलचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवार, २५ मे रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास जळगाव ते भादली दरम्यान घडली. या प्रकारणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

जळगाव येथे औद्योगिक वसाहत परिसरातील एका कंपनीत मशिनरी फिटिंग करायची असल्याने  मशिनरी कंपनीचे मॅकेनिकल इर्शाद मेहबूब यांच्यासह त्यांचा शालक समीर व अन्य एक असे  तिघे मॅकेनिकल नागपूर येथून रेल्वेने जळगावला येत होते. शनिवारी मध्यरात्री एक वाजेदरम्यान रेल्वे जळगाव ते भादली अप मार्गावर असताना खांबा क्रमांक ४२४/१४ ते ४२४/१५  दरम्यान इर्शाद मेहबूब हे रेल्वेतून खाली पडले व त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती जळगाव रेल्वे स्टेशन प्रबंधकांनी जळगाव तालुका पोलिसांना दिली. त्यानुसार पोहेकॉ अनिल फेगडे व पोलिस नाईक नरेंद्र पाटील यांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला.  याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दोघे स्थानकावर उतरले व मात्र तिसरा दिसेनारेल्वे जळगाव स्थानकावर पोहचली व तिघांपैकी दोघे जण येथे उतरले. त्या वेळी इर्शाद मेहबूब हे दिसले नाही. त्यामुळे दोघांनी स्थानकावर त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ते सापडत नसल्याने दोघेही सकाळपर्यंत स्थानकावर थांबले. त्या वेळी त्यांना समजले की, रात्री एक जण रेल्वेतून पडला व त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले आहे. त्यामुळे दोघेही रुग्णालयात पोहचले व तेथे मृतदेह पाहताच तो इर्शाद यांचा असल्याचे समजले. इर्शाद हे दरवाजात बसले असावे व त्यांना डुलकी लागून ते खाली पडले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव