शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

'थर्टी फर्स्ट' पूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकाचा 'धिंगाणा'; दुचाकीसह चारचाकीला धडक

By विजय.सैतवाल | Updated: December 30, 2023 22:53 IST

मद्यपी कारचालकाने बॅरिगेट उडवत दुचाकीसह चारचाकीला दिली धडक

जळगाव : मद्यधुंद अवस्थेत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आकाशवाणी चौकाकडे जाणाऱ्या प्रेमराज सुभाषराव वाघ (३६, रा. दहिवद, ता. चाळीसगाव) या कारचालकाने आकाशवाणी चौकानजीक तपासणीसाठी लावलेले बॅरिगेट उडवत तीन दुचाकी व एका चारचाकीला धडक दिली. यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. मद्यपी कारचालकाला वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून पकडले. ही घटना शनिवार, ३० डिसेंबर रोजी रात्री सव्वानऊ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ते आकाशवाणी चौकादरम्यान घडली. दरम्यान,  'थर्टी फर्स्ट' पूर्वीच धुमाकूळ घालणाऱ्या कारचालकाला पब्लिक मार बसणार होता, मात्र वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेत जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमराज वाघ हा जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे.  शनिवारी रात्री तो कारमधून (क्र. एमएच १२, एमएफ ९४८१) स्वातंत्र्य चौकाकडून आकाशवाणी चौकाकडे जात होता. यावेळी ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेच्यावतीने आकाशवाणीनजीक बॅरिगेट लागून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. त्या ठिकाणी लावलेल्या बॅरिगेट्स जवळ हा कारचालक न थांबता बॅरिगेट्सला उडवून सुसाट निघाला. त्यात पुढे असलेल्या तीन दुचाकी व एका चारचाकी वाहनाला त्याने धडक दिली.

यामध्ये वाहतूक शाखेचे कर्मचारी गुणवंत देशमुख, छोटू माधव बोरसे, सिद्धी छोटू बोरसे हे  जखमी झाले. या ठिकाणी हजर असलेले वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक डी.डी. इंगोले, पोहेकॉ चंद्रकांत पाटील,  योगेश पाटील, गुणवंत देशमुख, भाऊराव घेटे, पोकॉ किरण मराठे, विजय पाटील, पंडित साळी यांनी या कारचालकाचा पाठलाग करून त्याला सर्कल जवळच पकडले. या ठिकाणी संतप्त नागरिक त्याला चोप देणार होते, मात्र वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात नेले.

सुदैवाने गर्दी कमीकारचालकाने बॅरिगेट्सला उडविल्यानंतर एकामागे एक अशा तीन दुचाकी व एका कारला धडक दिली. ही घटना घडली त्यावेळी सुदैवाने या चौकात गर्दी कमी होती, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. 

नागरिकांचा संताप अनावरकारचालकाने दुचाकी व चारचाकीला धडक दिल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी नागरिकांचा संताप अनावर झाला.  नागरिक कारची तोडफोड करणार होते, त्यावेळी पोलिसांनी तत्काळ कार ताब्यात घेऊन घटनास्थळावरून इतरत्र हलविलली.

पोलिसांना दमदाटीघटनेनंतर सदर कारचालकाला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले जात असताना त्याने आडमुठेपणा करीत पोलिसांनाही दमदाटी केली.

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघात