शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीला वाचविण्याच्या नादात बस आदळली झाडावर; चार प्रवासी जखमी 

By सागर दुबे | Updated: May 3, 2023 19:54 IST

जळगाव तालुक्यातील शिरसोली रस्त्यावर दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात असलेल्या बसचा अपघात झाला. 

शिरसोली (जळगाव) : जळगाव तालुक्यातील शिरसोली रस्त्यावर दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात सुसाट प्रवासी खासगी बस झाडाला आदळून अपघात झाल्याची घटना बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये चार प्रवाशांना दुखापत झाली असून त्यांना उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही. तर बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे.

बुधवारी दुपारी खासगी बस ही प्रवाशांना घेवून जळगावकडून पाचोराकडे निघाली होती. दुपारी ४ वाजेच्या सुमारास शिरसोली रस्त्यावरील हॉटेल प्रितजवळून बस जात असताना अचानक दुचाकी समोर आली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि क्षणार्धात बसही रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जोराने आदळली. अपघातानंतर चालक पसार...बस झाडाला आदळल्यानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. तर बसच्या पुढील भागाचे काच फुटून बाहेर पडले होते. दुसरीकडे अपघातानंतर शिरसोली ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तर एमआयडीसी पोलिस ठाण्यातील मंदार पाटील, समाधान टहाकळे यांनी सुध्दा घटनास्थळ गाठले होते. ग्रामस्थांनी जखमींना बाहेर काढून रूग्णवाहिका बोलविली. जखमींना रूग्णालयात हलविले...या अपघातामध्ये रिना श्रीराम मोहन (१५) रा. पाचोरा, नुरबानो जमील बागवान (४४), नम्रा जमील बागवान (२०) आणि ओंकार तुकाराम पाटील (६५, सर्व रा.पाचोरा) हे प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. शिरसोली ग्रामस्थांसह पोलिसांनी जखमींना रूग्णवाहिकेतून तत्काळ उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात हलविले. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. तत्काळ उपचार सुरू...जखमींना जिल्हा रूग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिका-यांकडून तत्काळ उपचार करण्यात आले. यात काहींना डोक्याला तर काहींना हाता-पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तर काहींना मुक्कामार लागला आहे. रूग्णालयात देखील बघ्यांची गर्दी जमली होती.

  

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघात