९० टक्के गुन्ह्यांची उकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:20 IST2021-09-17T04:20:44+5:302021-09-17T04:20:44+5:30

अल्पवयीन मुलींवरील अत्याचार असो किंवा पळवून नेण्याच्या दाखल गुन्ह्यांत ९० टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे. ...

90% solution of crimes | ९० टक्के गुन्ह्यांची उकल

९० टक्के गुन्ह्यांची उकल

अल्पवयीन मुलींवरील अत्याचार असो किंवा पळवून नेण्याच्या दाखल गुन्ह्यांत ९० टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे. विनयभंगाच्या गुन्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. बलात्काराचे ९९ टक्के गुन्हे उघड झाले आहेत. आरोपींना अटक झालेली आहे. परप्रांतात गेलेल्या अल्पवयीन मुली व त्यांना पळविणाऱ्या मुलांचाच शोध घ्यायला अडचणी निर्माण होतात, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, अशा प्रकरणात पोक्सो व बलात्काराचेही वाढीव कलम लागलेले आहे.

चार वर्षांत ५२७ मुलींचा शोध

२०१८ ते मे २०२१ या कालावधीत ६२३ अल्पवयीन मुलींना पळवून नेण्यात आले होते, त्यापैकी ५२७ मुलींचा शोध लागलेला आहे. यातील काही मुली पालकांसोबत गेल्या तर काही मुलींना निरीक्षणगृहात दाखल करण्यात आले आहे.

महिना बलात्कार अपहरण

जानेवारी ०७ - २४

फेब्रुवारी ११ - १०

मार्च ११ - १९

एप्रिल ११ - २०

मे ०७ - १९

जून १० - २१

जुलै ०८ - २३

ऑगस्ट ०८ - १९

एकूण ७३ - १५५

Web Title: 90% solution of crimes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.