इन्फो:
ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्यांना ५० टक्केच प्रतिसाद
महामंडळाने ग्रामीण भागातील सर्व मार्गांवर दिवसा बससेवा सुरू केली असून, रात्रीच्या मुक्कामी बसेसही सुरू केल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागात शाळा-महाविद्यालये बंद असल्यामुळे प्रवाशांचा अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद नाही. सध्या ५० टक्केच प्रवाशांचा प्रतिसाद असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले, तर बाजाराच्या दिवशी ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे, त्या दिवशी बसेसला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
शहरी भागात जाणाऱ्या गाड्या फुल्ल
-जळगाव आगारातर्फे नाशिक, औरंगाबाद, धुळे, पुणे या शहरी मार्गावर वेळापत्रकाप्रमाणे बसेस सोडण्यात येत असून, या सर्व मार्गांवर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे.
- सध्या रेल्वे गाड्यांना जनरल तिकीट बंद असून, त्यात तिकीट आरक्षणही होत नसल्यामुळे नाशिक, औरंगाबाद, पुणे या मार्गावर जाणारे प्रवासी बसकडे वळत आहेत. त्यामुळेही या मार्गावरच्या बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे.
- तसेच महामंडळातर्फे शहरी मार्गांवर धावणाऱ्या बसेसलाही ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली असल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढली असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
जळगाव आगारातर्फे शहरी भागासह ग्रामीण भागातील ९० टक्के गावांना मुक्कामी बस सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय टळली आहे. तसेच सध्या नाशिक, औरंगाबाद, पुणे या मार्गांवर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. प्रवाशांच्या गर्दीनुसार जादा बसेस सोडण्यात येत आहेत.
नीलेश पाटील, व्यवस्थापक, जळगाव आगार
इन्फो :
मुक्कामी जाणाऱ्या १६ गावांना बससेवा सुरू
जळगाव आगारातून गेल्या आठवड्यापासून मुक्कामी जाणाऱ्या चोपडा, शिरपूर, नंदगाव, रंवजा, दहिगाव, खेडी-कढोली, नांदेड, चाळीसगाव या गावांना मुक्कामी बससेवा नियमित सुरू केल्या आहेत. रात्री वेळापत्रकाप्रमाणे मुक्कामासाठी वेळापत्रकाप्रमाणे जळगाव आगारातून या बसेस निघत आहेत.
इन्फो :
मुक्कामी गाडी येत असल्याने त्रास वाचला
कोरोनामुळे पूर्वी गाडी मुक्कामी येत नसल्यामुळे सकाळी जळगावला येण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. खासगी वाहनांनी जादा पैसे मोजून जळगावला यावे लागायचे. आता अनलॉकनंतर गावात मुक्कामी बस येऊ लागल्याने नागरिकांचा त्रास वाचला आहे. यापुढेही मुक्कामी बससेवा सुरू ठेवणे महामंडळाने गरजेचे आहे.
दिलीप पाटील, प्रवासी
ग्रामीण भागात आजही अनेक नागरिक एसटीच्या प्रवासाला प्राधान्य देत असतात. त्यात विशेषत: शहरात येण्यासाठी रात्री मुक्कामी येणाऱ्या बसेसला प्राधान्य देतात. कोरोना काळत मुक्कामी बससेवा बंद असल्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत होता. आता मात्र जळगाव आगारातर्फे मुक्कामी बससेवा नियमित झाल्याने गैरसोय टळली आहे.
संजय देसले, प्रवासी