९२ महाविद्यालयांना नोटिसा
By Admin | Updated: May 14, 2014 00:41 IST2014-05-14T00:41:22+5:302014-05-14T00:41:22+5:30
‘पुअर’ असा शेरा मारला गेला आहे, अशा ९२ महाविद्यालयांना ‘एमएसबीटीई’तर्फे (महाराष्टÑ स्टेट बोर्ड आॅफ टेक्निकल एज्युकेशन) कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

९२ महाविद्यालयांना नोटिसा
जळगाव : राज्य तंत्र शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या तंत्रनिके तन व औषध विज्ञानशास्त्र महाविद्यालयांच्या शैक्षणिक आवेक्षणावर ‘पुअर’ असा शेरा मारला गेला आहे, अशा ९२ महाविद्यालयांना ‘एमएसबीटीई’तर्फे (महाराष्टÑ स्टेट बोर्ड आॅफ टेक्निकल एज्युकेशन) कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते. शैक्षणिक वर्ष २०१३-१४ मध्ये राज्यभरातील तंत्रनिकेतन व औषध विज्ञानशास्त्र महाविद्यालयांमध्ये द्वितीय शैक्षणिक आवेक्षण झाले. मात्र, त्यात महाराष्टÑ स्टेट बोर्ड आॅफ टेक्निकल एज्युकेशनच्या अधिकार्यांना अनेक त्रुटी आढळून आल्याने राज्यातील ९२ महाविद्यालयांना ‘पुअर’ अशी श्रेणी मंडळातर्फे देण्यात आल्यामुळे मंडळाने संबंधित महाविद्यालयांच्या ‘अकॅडमिक मॉनिटरिंग पोर्टल लॉगीन’वर, तसेच डाकद्वारे नोटिसा पाठविल्या आहेत. १७ मेपर्यंत उत्तर एमएसबीटीईने दिलेल्या नोटिसांमध्ये संबंधित महाविद्यालयांनी १७ मेपर्यंत उत्तर मंडळाच्या मुंबई येथील कार्यालयात उपस्थित राहून देणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. संस्थेचे अध्यक्ष, सचिव व प्राचार्य यांनी स्वत: उपस्थित राहून त्यांचे म्हणणे मांडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विभागनिहाय होणार सुनावणी नोटिसीला उत्तर दिल्यानंतर विभागनिहाय सुनावणी होणार असून त्यामध्ये औरंगाबाद, पुणे, मुंबई व नागपूर विभागांतर्गत येणार्या तंत्रनिकेतन व औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांचा समावेश आहे. अन्यथा संलग्नता रद्द होईल सूचना देऊनही ज्या संस्था त्यांच्या त्रुटींची पूर्तता मंडळाने सांगूनदेखील कार्यालयात उपस्थित राहून करणार नाही, त्या महाविद्यालयांची संलग्नता रद्द करण्यात येईल, असे महाराष्टÑ राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक प्रमोद नाईक यांनी कळविले आहे.