8th birth anniversary of the wealthy Pratap Sheth at Amalner | अमळनेर येथे श्रीमंत प्रतापशेठ यांची १४०वी जयंती साजरी
अमळनेर येथे श्रीमंत प्रतापशेठ यांची १४०वी जयंती साजरी

ठळक मुद्देप्रताप तत्त्वज्ञान केंद्रात आठवणींना उजाळादानशूर व्यक्तिमत्व, शिक्षण, उद्योग, सेवा व अध्यात्म अशा विविधांगी क्षेत्रात अविस्मरणीय कार्य

अमळनेर, जि.जळगाव : येथील दानशूर व्यक्तिमत्व, शिक्षण, उद्योग, सेवा व अध्यात्म अशा विविधांगी क्षेत्रात अविस्मरणीय कार्य करणारे श्रीमंत प्रतापशेठ यांची १४०वी जयंती बुधवारी प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात साजरी करण्यात आली.
प्रताप तत्त्वज्ञान केंद्राचे मानद संचालक प्राचार्य डॉ.एस.आर.चौधरी व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. तत्त्वज्ञान विषयाचे अभ्यासक व चिंतक असलेले प्रतापशेठ यांनी तत्त्वज्ञान केंद्राची स्थापना केली. अनेक अभ्यासक शेठजींच्या दातृत्वामुळे या केंद्रात अभ्यासासाठी येऊन गेले. त्याचप्रमाणे शैक्षणिक, सामाजिक,आरोग्य व अध्यात्मिक असे वेगवेगळे अजरामर कार्य प्रतापशेठ यांनी केले अशा आठवणींना उजाळा देण्यात आला.
याप्रसंगी सिनेट सदस्य दिनेश नाईक, प्रा.धर्मसिंह पाटील, प्रा.डॉ.धीरज वैष्णव, प्रा.डॉ.राधिका पाठक, प्रा.प्रमोद चौधरी, पंडित नाईक, रंजना फालक, युनूस पठाण, गोपाल माळी, अविनाश पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: 8th birth anniversary of the wealthy Pratap Sheth at Amalner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.