भुसावळ विभागातील ८६ कर्मचारी सेवानिवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:13 IST2021-06-01T04:13:08+5:302021-06-01T04:13:08+5:30

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे समारंभाचे आयोजन न करता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान व्हर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाद्वारे तसेच त्यांच्या सेवेच्या कार्यालयात रेल्वे ...

86 employees of Bhusawal division retired | भुसावळ विभागातील ८६ कर्मचारी सेवानिवृत्त

भुसावळ विभागातील ८६ कर्मचारी सेवानिवृत्त

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे समारंभाचे आयोजन न करता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान व्हर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाद्वारे तसेच त्यांच्या सेवेच्या कार्यालयात रेल्वे प्रतिनिधी म्हणून बुऱ्हाणपूर, खंडवा, चाळीसगाव, भुसावळ, बडनेरा, मनमाड, अकोला आदी ठिकाणी कल्याण निरीक्षकांनी जाऊन पी.पी.ओ फोल्डर दिले. तसेच मंडल रेल प्रबंधक कार्यालयात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सहाय्यक कार्मिक अधिकारी बी. एस. रामटेके यांच्या हस्ते पी.पी.ओ. फोल्डर दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी वीरेंद्र वडनेरे यांनी केले.

सेवानिवृत्तीबद्दल कर्मचाऱ्यांना विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता व वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन. डी. गांगुर्डे यांनी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आभार मंडळ कार्मिक अधिकारी दिलीप खरात यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेटलमेंट आणि लेखा विभागातील कर्मचारी तसेच सर्व कल्याण निरीक्षक आदींनी परिश्रम घेतले.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप देताना रेल्वे अधिकारी.

Web Title: 86 employees of Bhusawal division retired