प्रज्ञाचक्षू वृद्धेच्या मदतीला धावले ८५ वर्षीय वैद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:11 AM2019-02-25T00:11:33+5:302019-02-25T00:11:57+5:30

‘लोकमत’च्या वृत्तानंतर अमळनेर येथून चंदनपुरीत धाव

The 85-year-old Vaidya, who was promoted to the elderly, | प्रज्ञाचक्षू वृद्धेच्या मदतीला धावले ८५ वर्षीय वैद्य

प्रज्ञाचक्षू वृद्धेच्या मदतीला धावले ८५ वर्षीय वैद्य

googlenewsNext

कासोदा, ता. एरंडोल : आर्थिक स्थिती बिकट असल्याने उपचाराअभावी दृष्टी गमावलेल्या वृद्धेचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर चंदनपुरी येथील दाम्पत्याच्या मदतीसाठी ओघ सुरूच आहे. यात रविवारी तर एक ८५ वर्षीय वृद्ध वैद्य या महिलेच्या मदतीसाठी चंदनपुरी येथे पोहचेल व उपचार केले.
ै ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त ‘लोकमत’ने १४ रोजी प्रकाशित केलेल्या विशेष पुरवणीत चंदनपुरी येथील दृष्टीहीन पत्नीची सेवा करणारा पती अशाया आर्थिक विवंचनेत असलेल्या एका वृद्ध दाम्पत्याचे छायाचित्र प्रसिद्ध केले होते. हे छायाचित्र पाहून अनेक जण मदतीला धावले. यात अमळनेर तालुक्यातील ८५ वर्षे वयाच्या वृद्ध वैद्याच्या संवेदनाही जाग्या झाल्या आणि ते रविवारी चंदनपुरी येथे पोहचले व वृद्धेवर उपचार सुरू केले.
या वृद्धेचे पूर्वी अर्धे डोके दुखत होते. उपचाराला पैसे नसल्याने तिची दृष्टी गेल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये वाचल्यानंतर मूळ ढेकू येथील रहिवासी व सध्या अमळनेर येथे राहत असलेले डॉ. प्रताप सोनवणे यांनी त्यांच्याकडील आयुर्वेदाची अनेक पुस्तके पहिली. त्यात असे अर्धे डोके दुखत असल्यावर दृष्टी गेल्याने उपचाराची माहिती मिळविली. त्यानुसार औषध तयार केले व ते रविवारी कासोदा येथे पोहचले. कासोदा येथील भास्कर चौधरी हे वैद्यांना चंदनपुरी येथे घेऊन गेले.
डॉ. प्रताप सोनवणे यांनी वृद्धेची तपासणी केली. तिच्या नाकात काही औषध टाकली तर काही औषध डोळ््यातदेखील टाकले. सलग आठ दिवस हा उपचार करण्याचा सल्ला दिला.
सुमारे तीस वर्षांपूर्वी या वृद्धेचे डोके दुखत असताना दृष्टी गेली. त्यामुळे कदाचित या उपचाराने फायदा होईल की नाही याबद्दल साशंकता असली तरी या वयोवृद्ध वैद्याची संवेदनशीलतेची प्रचिती या घटनेवरून दिसून आली. या उपचारामुळे सदर दांपत्याला एक आशेचा किरण दिसू लागला आहे. या उपचाराने वृद्धेच्या अंधाऱ्या विश्वात जर काही आशेचा किरण आला तर हा वैद्य या कुटुंबाला देवापेक्षा कमी निश्चितच नसणार. गावात या घटनेची आज दिवसभर चर्चा होती.

Web Title: The 85-year-old Vaidya, who was promoted to the elderly,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव