८४ विद्यार्थ्यांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:16 IST2021-01-03T04:16:56+5:302021-01-03T04:16:56+5:30

जळगाव - मूळजी जेठा महाविद्यालयात एन.सी.सी. आणि एन.एस.एस. यांच्या संयुक्त विद्यमाने ३० डिसेंबर रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. ...

84 students donated blood | ८४ विद्यार्थ्यांनी केले रक्तदान

८४ विद्यार्थ्यांनी केले रक्तदान

जळगाव - मूळजी जेठा महाविद्यालयात एन.सी.सी. आणि एन.एस.एस. यांच्या संयुक्त विद्यमाने ३० डिसेंबर रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी ८४ विद्यार्थ्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व निभावले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कर्नल प्रवीण धिमान यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा.डॉ. ए.पी. सरोदे, प्रा.डॉ. के.जी. खडसे, डॉ. योगेश बोरसे आदी उपस्थित होते.

०००००००००००००००००००००००००००

बारी पंच मंडळाची रविवारी सर्वसाधारण सभा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - बारी पंच मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी सकाळी १० वाजता जोशीपेठेतील बारी समाज हितवर्धिनी येेथे आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे समाजबांधवांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन पंच मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विजय बारी, मयूर बारी, हर्षल बारी, अरुण बारी यांच्याशी संपर्क साधण्याचेही आवाहन केले आहे.

०००००००००००००००००००००००००

जय संत सेना

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - संत सेना नाभिक हितवर्धक संघाच्या शहर संघटनेच्या वतीने शनिवारी सकाळी ८ वाजता बॅरिस्टर हुतात्मा वीर भाई कोतवाल यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व समाजबांधवांनी बॅरिस्टर हुतात्मा वीर भाई कोतवाल चौक येथे उपस्थित राहण्याचे आवाहन जगदीश निकम, महारू इसे, अनिल निकम, अरुण वसाने आदींनी केले आहे.

Web Title: 84 students donated blood