गणेश मंडळ कार्यकर्त्यांचे ८० टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:22 IST2021-09-10T04:22:52+5:302021-09-10T04:22:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत गणेशोत्सवात विविध गणेश मंडळांच्या ८० ते ८५ टक्के कार्यकर्त्यांचे लसीकरण ...

गणेश मंडळ कार्यकर्त्यांचे ८० टक्के लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत गणेशोत्सवात विविध गणेश मंडळांच्या ८० ते ८५ टक्के कार्यकर्त्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांनी दिली आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका यांच्या विद्यमाने याबाबत ४ ते ५ सप्टेंबर ही दोन दिवस विशेष मोहीम राबविण्यात आली होती. उर्वरित लसीकरणही तातडीने पूर्ण करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेच्या मुलतानी रुग्णालयात याबाबत स्वतंत्र मोहीम राबविण्यात आली होती, अशी माहिती प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी दिली. यासह आता महापालिकेच्या ज्या केंद्रांवर लसीकरण सुरू आहे, त्या कोणत्याही केंद्रांवर मंडळाचे कार्यकर्ते आल्यानंतर त्यांचे लसीकरण होणार आहे. त्यांची स्वतंत्र नोंद नसेल नियमितच्या लसीकरणातच त्यांचे लसीकरण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या दोन दिवसात शिवाय टप्प्याटप्याने ८० ते ८५ टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचे सचिन नारळे यांनी सांगितले.