जिल्ह्यात कोरोनाचे ८० नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:17 IST2020-12-31T04:17:18+5:302020-12-31T04:17:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसांपासून ५० च्या आत असलेला कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा वाढला आहे. बुधवारी ...

80 new corona patients in the district | जिल्ह्यात कोरोनाचे ८० नवे रुग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे ८० नवे रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून ५० च्या आत असलेला कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा वाढला आहे. बुधवारी दिवसभरात ८० नवे बाधित आढळून आले असून त्यात जळगाव शहरातील २७ नव्या रुग्णांचा समावेश आहे. तर, भुसावळ तालुक्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या तिघांचे वय ७० च्या पुढेच आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने ५५ हजार ७९५ चा टप्पा गाठला आहे. तर, बरे झालेल्यांंची संख्यादेखील ५४ हजारांच्या पार गेली आहे. सद्य:स्थितीत कोरोनाच्या ४३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या आठवडाभरापासून कोविडच्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर चाचणी केलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. मात्र, बुधवारी ॲण्टीजेन चाचणी केलेल्यांपैकी ६१ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत, तर आरटीपीसीआर चाचणीतून १९ रुग्ण समोर आले आहेत.

Web Title: 80 new corona patients in the district