एकाच कॉलनीत 80 टक्के अवैध कनेक्शन
By Admin | Updated: October 10, 2015 00:42 IST2015-10-10T00:42:47+5:302015-10-10T00:42:47+5:30
धुळे : शुक्रवारी राबविण्यात आलेल्या मोहिमेत जमनागिरी कॉलनीत 80 टक्के नळ कनेक्शन अवैध आढळून आले.

एकाच कॉलनीत 80 टक्के अवैध कनेक्शन
धुळे : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे अवैध नळ कनेक्शन शोध मोहीम आणि नळाला तोटय़ा न लावणा:या लोकांविरुद्ध दंडात्मक कारवाईची मोहीम राबविली जात आहे. शुक्रवारी राबविण्यात आलेल्या मोहिमेत जमनागिरी कॉलनीत 80 टक्के नळ कनेक्शन अवैध आढळून आले. दरम्यान, आठवडय़ाभरात नळाला तोटय़ा न बसविणा:या 40 लोकांकडून 1 लाख 20 हजारांची दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती मनपाचे कनिष्ठ अभियंता श्रीकांत पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. चक्करबर्डी परिसर शहरातील जमनागिरी परिसरात महापालिकेच्या विशेष पथकाने अचानक धाड टाकली़ शोध घेतला असता या भागात सुमारे 80 टक्के नागरिकांकडे अवैध नळ कनेक्शन असल्याचे आढळून आल़े सापडलेल्या सर्वाना नळ कनेक्शन दंडात्मक रक्कम भरून वैध करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या़ याशिवाय चक्करबर्डी परिसरत आणि मोगलाई भागात असलेल्या गवळीवाडा भागातही काही प्रमाणात अवैध नळ कनेक्शन आढळून आले आहे. त्या सर्वानाही नळ कनेक्शन वैध करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. लेनिन चौक परिसर शहरातील फाशी पूल भागात असलेल्या लेनिन चौक परिसरात तपासणी केली असता नळाला तोटय़ा आढळून आल्या नाही़ याशिवाय अवैध नळ कनेक्शनदेखील सापडल़े त्या सर्वाना समज देण्यात आली़ ज्या ठिकाणी तोटय़ा आढळल्या नाही, अशा नळधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली़ दंडात्मक कारवाई शहरात राबविण्यात येत असलेल्या या विशेष मोहिमेत 40 जणांच्या नळाला तोटय़ा लावल्या नसल्याचे उजेडात आल़े त्या प्रत्येकाला 3 हजारप्रमाणे दंड ठोठावण्यात आला आह़े एकंदरीत पाहता त्यांच्याकडून 1 लाख 20 हजार रुपयांचा दंड वसूल करून महापालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात आला आह़े पथकात यांचा समावेश महापालिकेच्या विशेष पथकात कनिष्ठ अभियंता श्रीकांत पाटील, अजिंक्य पाटील, फिटर वाल्मीक कोळी, व्हॉल्व्हमन शंकर पवार, संजय अजळकर यांचा समावेश आह़े विविध भागात फिरून पथकाकडून कारवाई केली जात आह़े दरम्यान, अशाप्रकारची शोध मोहीम अव्याहतपणे आता यापुढील काळात सुरू राहणार असल्याची माहिती महापालिका पथकाने 4तोटय़ा नसलेल्या नळधारकांवर दंडात्मक कारवाई करावी़ अवैधरित्या नळकनेक्शन घेतलेल्यांना कनेक्शन वैध करून घेण्याची ताकीद द्यावी, अशा सूचना आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांनी विशेष पथकाला दिल्या आहेत़ 4नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचा:यांकडून कारवाई होत असल्याने यापूर्वीच्या जून्या कर्मचा:यांनी आजवर काय केले? संबंधितांवर कारवाई का केली नाही? असा सवाल साहजिकच आता उपस्थित होत आह़े