मुक्ताईनगर येथे दारुबंदीसाठी 8 ते 10 हजार महिला धडकल्या तहसील कार्यालयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 13:55 IST2018-01-05T13:53:22+5:302018-01-05T13:55:22+5:30

भव्य मोर्चा

8 to 10 thousand women stormed the Tehsil office | मुक्ताईनगर येथे दारुबंदीसाठी 8 ते 10 हजार महिला धडकल्या तहसील कार्यालयावर

मुक्ताईनगर येथे दारुबंदीसाठी 8 ते 10 हजार महिला धडकल्या तहसील कार्यालयावर

ऑनलाईन लोकमत

मुक्ताईनगर, जि. जळगाव, दि. 05- दारुबंदी करण्यात यावी, या मागणीसाठी मुक्ताईनगर येथे शिवसेनेच्यावतीने  तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा  काढण्यात आला. यामध्ये 8 ते 10 हजार महिलांनी धडक दिली. या वेळी दिलेल्या घोषणांनी शहर दणाणून निघाले होते. 
दारुबंदीसाठी महिलांकडून मागणी करण्यात येत असली तरी त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने शुक्रवारी सकाळी 8 ते 10 हजार महिलांनी एकत्र येत मोर्चा काढला. नागेश्वर मंदिरापासून मोर्चाला सुरुवात होऊन तो तहसील कार्यालय परिसरात धडकला. या ठिकाणी मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. मोर्चादरम्यान महिलांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता. 

Web Title: 8 to 10 thousand women stormed the Tehsil office