शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

७८ जवान आणणार वाळूमाफियांवर संक्रांत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 18:51 IST

घाटांच्या सुरक्षेसाठी होणार तैनात : महामंडळाचे अधिकाऱ्यांशी आज चर्चा.

कुंदन पाटील/ जळगाव : वाळूमाफियांना ठेचण्यासाठी यापुढे तापी आणि गिरणा नदीकाठच्या डझनभर ‘हॉट स्पॉट’वर राज्य सुरक्षा महामंडळाचे सशस्त्रधारी ७८ जवान तैनात करण्यात येणार आहेत.तसा प्रस्ताव महसुल प्रशासनाने राज्य सुरक्षा महामंडळाला दिला आहे. त्यानुसार बुधवारी महामंडळाचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून संक्रांतीनंतर ‘हॉट स्पॉट’ठरलेल्या वाळू घाटांवर जवान तैनात होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

कुणबी-मराठा सर्व्हेक्षण, लोकसभा निवडणुक आणि दैनंदिन कामकाजामुळे मोकळ रान मिळणार, या भ्रमात असलेल्या वाळूमाफियांना यंदाची संक्रांत चांगलीच त्रासदायक ठरणार आहे. कारण दि.१५ जानेवारीनंतर आगामी अडिच महिन्यांच्या कालावधीसाठी १२ वाळूघाटांवर राज्य सुरक्षा महामंडळाचे शस्त्रधारी जवान तैनात करण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. 

आज आढावा घेणारदरम्यान, यापूर्वी राज्य सुरक्षा महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी  ‘हॉट स्पॉट’ ठरलेल्या वाळूघाटांची पाहणी केली आहे. जवान तैनात केल्यानंतर कारवाईची दिशा आणि माफियांना लगाम घालण्यासाठी आवश्यक ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्यासाठी राज्य सुरक्षा महामंडळाचे अधिकारी बुधवारी मुंबईहून जळगावात येणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या नेमणुकीवर शिक्कामोर्तब होणार आहे. जवानांच्या मानधनापोटी जिल्हा प्रशासनाकरवी त्यांना आगाऊ रकम अदा करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव