75 हजार भाविकांची हजेरी

By Admin | Updated: February 15, 2017 00:33 IST2017-02-15T00:33:07+5:302017-02-15T00:33:07+5:30

पद्मालय : अंगारकीनिमित्त यात्रोत्सव

75 thousand devotees attend | 75 हजार भाविकांची हजेरी

75 हजार भाविकांची हजेरी

एरंडोल : अंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे मंगळवारी सुमारे 75 हजार भाविकांनी हजेरी लाऊन गणरायाचे दर्शन घेतले. पहाटे नगराध्यक्ष रमेश परदेशी यांच्या हस्ते सप}ीक अभिषेक व पहापूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येऊन रात्री 11 वाजेर्पयत भक्तांची गर्दी कायम होती.
गणपती देवालयाच्या विश्वस्तांतर्फे अभिषेक कक्ष, पिण्याच्या पाण्याची सोय, सावलीसाठी मंडप, आरोग्य सेवा, 100 रुपयात खास दर्शनाची सुविधा आदी सेवा पुरविण्यात आल्या. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अमृत कोळी, उपाध्यक्ष आनंदराव पाटील, सचिव ए.एल. पाटील, अमीत पाटील, डॉ.पिंगळे यांनी यात्रोत्सवाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
परिवहन महामंडळातर्फे विविध ठिकाणांहून खास बसगाडय़ा सोडण्यात आल्या. पो.नि.बाळासाहेब केदारे, पी.एस.आय. एम.एस. बैसाणे व विजया अलोणे व त्यांच्या सहका:यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला. अनिरुद्ध बापूंच्या सुमारे 100 स्वयंसेवकांनी भक्तांना दर्शन घेण्याकामी सहकार्य केले.

Web Title: 75 thousand devotees attend