शहरं
Join us  
Trending Stories
1
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
2
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
3
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
4
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
5
महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम
6
मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये
7
धक्कादायक! उत्तर प्रदेशातील 'ब्लू ड्रम'नंतर आता उत्तराखंडमध्ये पत्नीने पेट्रोल ओतून पतीला जाळले
8
“उद्धव ठाकरे महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का?”; युती चर्चांवर मनसे नेत्याचा थेट सवाल
9
ट्रम्प टॅरिफचा पहिला धक्का! 'ही' दिग्गज कंपनी ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढणार
10
सर्वोच्च न्यायालयाचा अपमान, निशिकांत दुबे अडचणीत; कारवाई होणार? भाजपने हात झटकले...
11
झांबियामध्ये १९ कोटी रुपये अन् ४ कोटींचे सोने घेऊन जाताना भारतीयाला पकडले; दुबईला जाण्याच्या तयारीत होता
12
घरगुती मीटरवर इलेक्ट्रीक कार चार्ज केली; केला २५००० चा दंड, कार मालक रडकुंडीला आला...
13
IPL 2025 : सतरावं वरीस मोक्याचं! युवा क्रिकेटरच्या 'विरार टू चेन्नई व्हाया मुंबई' प्रवासाची गोष्ट
14
मुकेश अंबानींच्या रिलायन्सपासून ते टाटा ग्रुपपर्यंत, या १० कंपन्यांनी फक्त ३ दिवसांत कमावला मोठा नफा
15
वैजापूरमध्ये पहाटे थरार! चोरीच्या प्रयत्नात बँक जळून खाक...खातेदारांच्या पैशांचे काय होणार?
16
वैभव सूर्यवंशीच्या धडाकेबाज खेळाने गुगलचे सीईओही भारावले, सुंदर पिचाई कौतुक करत म्हणाले, "वयाच्या १४ व्या वर्षी…’’  
17
पंचग्रही योगात नववर्षाचे पहिले पंचक: ५ दिवस प्रतिकूल, अशुभ; ५ कामे टाळा, नेमके काय करू नये?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
19
पुण्यात कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, वॉटर पार्कमध्ये झिपलायनिंग करताना...
20
भीषण अपघात! लग्नावरून परतणाऱ्या तरुणांची कार गॅस टँकरला धडकली, २ जणांचा मृत्यू ,एक जखमी

शेळगाव प्रकल्पात होणार ७५ टक्के पाणीसाठा; धरण सुरक्षा मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी 

By आकाश नेवे | Updated: September 20, 2022 19:15 IST

शेळगाव प्रकल्पात होणार ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. 

जळगाव : यावल आणि जळगाव तालुक्यातील अनेक गावांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या शेळगाव बॅरेजचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे शासन नियमानुसार या मध्यम प्रकल्पात ७५ टक्के म्हणजे जवळपास ३ टीएमसी पाणीसाठा केला जाऊ शकतो. त्यासाठी धरण सुरक्षा मंडळ, नाशिक विभागाचे अधिक्षक अभियंता महेंद्र आमले यांनी मंगळवारी शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पाची पूर्ण पाहणी केली आहे. तसेच तांत्रिकदृष्ट्या या प्रकल्पात पाणीसाठा करण्यास मान्यता मिळाली आहे.

शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पाचे बांधकाम आणि द्वार उभारणीचे काम तसेच दार बंद करण्यासाठी आवश्यक कामे पूर्ण झाली आहेत. या वर्षी शेळगाव बॅरेजमध्ये ७५ टक्के पाणीसाठा केला जाणार आहे. या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ४.११ टीएमसी आहे. त्याच्या ७५ टक्के म्हणजे जवळपास ३ टीएमसी पाणी या वर्षी धरणात साठवले जाणार आहे. यासाठी आज धरण सुरक्षा मंडळ नाशिक येथील अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, मंडळाचे कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांनी प्रकल्प स्थळावर येऊन सर्व आवश्यक तपासणी आणि पाहणी केली. त्यानंतर त्यांनी या प्रकल्पात पाणीसाठा करण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला आहे. यावेळी प्रकल्पाचे सल्लागार पी. आर. पाटील, पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे, कार्यकारी अभियंता आणि इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रकल्पाची पाहणी केली. तसेच गेट व्यवस्थित कार्यरत आहेत की नाही याची पाहणी केली. याशिवाय पाणीसाठा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेही ना हरकत प्रमाणपत्र लागणार आहे. ते मिळाल्यानंतर पाणीसाठा करणे शक्य होणार आहे.

काय आहे शेळगाव प्रकल्पाचे फायदेशेळगाव प्रकल्प हा जळगाव शहरापासून १८ किमीवर असलेल्या शेळगाव गावाजवळ आहे. या प्रकल्पाला १९९७-९८ मध्ये सुरुवात करण्यात आली. त्यानंतर हा प्रकल्प आता पूर्णत्वाला आला होता. यावल तालुक्यात डार्क झोनमध्ये असणाऱ्या ९१२८ हेक्टर शेतजमिनीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. जळगाव व भुसावळ येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, खासगी औद्योगिक वसाहती, खासगी उद्योग समूहासाठी आवश्यक औद्योगिक वापरासाठी मुबलक पाणी व पुढील ५० वर्षांसाठी आवश्यक पाण्याचे नियोजनानुसार आवश्यक मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. भुसावळ शहर पाणीपुरवठ्यासाठी शाश्वत स्रोत आणि मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच भुसावळ रेल्वे जंक्शन आणि इतर रेल्वे वसाहतींसाठीही पाणी उपलब्ध होणार आहे.

 

टॅग्स :JalgaonजळगावDamधरणWaterपाणी