जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी 700 कोटी
By Admin | Updated: April 8, 2017 13:32 IST2017-04-08T13:32:35+5:302017-04-08T13:32:35+5:30
जिल्ह्यात 22 हजार 765 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी 700 कोटी
गिरीश महाजन यांचे प्रय} : 22 हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार
जळगाव : जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी 700 कोटींची तरतूद करण्यात आली असून याव्दारे जिल्ह्यात 22 हजार 765 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.
जिल्ह्याची सिंचन क्षमता वाढावी म्हणून जिल्ह्यातील 17 प्रकल्पांच्या कामांना चालना देण्याचे नियोजन तापी पाटबंधारे महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. 2016-17 या अर्थसंकल्पीय वर्षात 17 प्रकल्पांकरिता 476.38 कोटी इतक्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या वाघूर प्रकल्पासाठी 409 कोटींची तरतूद करून कामांना गती देण्यात आली आहे. वाघूर उपसा सिंचन योजनेमधील जामनेर, गारखेडा, व गाडेगाव या शाखांमार्फत 12245 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. तापी नदीवरील शेळगाव बॅरेज प्रकल्पाच्या 699.48 कोटी रकमेस शासनस्तरावरून सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. तसेच अटगव्हाण व दिघी -3 साठवण तलाव या दोन प्रकल्पांनाही सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. बोदवड उपसा सिंचन योजनेची कामे सुरू करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त झाली आहे.
प्रकल्पनिहाय आर्थिक तरतूद
सिंचन प्रकल्पांसाठी 2017-18 या वर्षात 211.19 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रकल्पनिहाय तरतूद पुढील प्रमाणे आहे. रक्कम कोटीत. वाघूर- 84.75, वरखेडे लोंढे 40.00, निमA तापी (पाडळसे)- 25.00, शेळगाव बॅरेज - 25.00, कांग योजना- 18.00