शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सत्तरीत भिजवली ७० एकर जमीन; स्वखर्चाने अडविले पाणी, संपूर्ण क्षेत्र आले ओलिताखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 06:56 IST

उद्योग व्यवसाय सांभाळताना वयाच्या सत्तरीतही शेतीची आवड असल्याने व समाजोपयोगी काम करण्याची तळमळ असल्याने उतारवयातही खान्देश जिनिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी पिंपळकोठा खुर्द (ता.एरंडोल जि.जळगाव) येथील आपल्या वडिलोपार्जित ७० एकर जमिनीतील १ कि.मी. नाल्यावर बांध करून ‘पाणी आडवा पाणी जिरवा’चा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. 

- राम जाधवजळगाव : उद्योग व्यवसाय सांभाळताना वयाच्या सत्तरीतही शेतीची आवड असल्याने व समाजोपयोगी काम करण्याची तळमळ असल्याने उतारवयातही खान्देश जिनिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी पिंपळकोठा खुर्द (ता.एरंडोल जि.जळगाव) येथील आपल्या वडिलोपार्जित ७० एकर जमिनीतील १ कि.मी. नाल्यावर बांध करून ‘पाणी आडवा पाणी जिरवा’चा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. स्व:खर्चाने शेतातून गेलेला संपूर्ण नाला अडवून त्याचे खोलीकरण केले. स्वत:च्या शेतीसोबतच परिसरातील चार गावांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न यातून सुटला. यामुळे त्यांचे संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली आले आहे.२०१५-१६ मध्ये पिंपळकोठा खुर्द व बुद्रूक आणि पिंप्री खुर्द व बुद्रूक या गावांना पाणीटंचाईचा भीषण सामना करावा लागला. या समस्येने महिला व मुलांची पाण्यासाठीची होणारी भटकंती पाहून सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून, गावाला लागूनच असलेल्या आपल्या शेतातील दोन विहिरीतील पाणी प्रदीप जैन यांनी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले़ त्याचवेळी त्यांनी यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला.२०१६ मध्येच शेतातून गेलेल्या सार्वजनिक नाल्याच्या खोलीकरणाचे व रुंदीकरणाचे काम स्व:खर्चातून केले. यासाठी शासकीय यंत्रणेचे वाट न पाहता, जेसीबी मशीनच्या साहाय्याने जवळपास १ किलोमीटर अंतराच्या नाल्याचे काम पूर्ण केले. या नाल्यात त्यांनी ठिकठिकाणी एका ठरावीक अंतरावर मातीचेच बांध ठेवून खोल खड्डेही केले. यामुळे या नाल्यात लाखो लीटर पाण्याचा सहजरित्या साठा होऊ लागला. हे पाणी जमिनीतून झिरपून परिसरातील विहिरींनाही याचा मोठा लाभ झाला आहे.याच नाल्याच्या काठावर असलेल्या पिंपळकोठा व पिंप्री गावाच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीही तुडुंब भरल्या आहेत़ यामुळे बाराही महिने या विहिरींना पाणी राहू लागल्याने आता ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे़ गावातील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या नळांना आता दररोज अर्धा तास पाणीपुरवठा होत आहे़ तसेच पाटचारीतून वाया जाणारे पाणी या नाल्यात साठवले जात आहे.

शेततळ्यालाच लागले पाणीजैन यांनी त्यांच्याच शेताच्या वरच्या भागात असलेल्या जमिनीत नाल्याच्या काठावरच एक शेततळे तयार केले आहे़ या शेततळ्याला त्यांनी रुंदीकरणासह १८ फुटांपेक्षा अधिक खोलही केले़ यातच या तळ्याला पाझर फुटल्याने हा तलाव बारमाही जिवंत झºयाचा तलाव झाला आहे़ तसेच पाटचारी व नाल्याला येणारे पाणी या तलावात पाझरत असल्याने त्याचा मोठा जलसाठा तयार झाला आहे़ यातून खालच्या भागातील विहिरीत पाणी पाझरत आहे.

ऊस शेतीला प्राधान्यजळगाव येथे राहून शेती सांभाळताना त्यांनी ठोक पिके घेण्याचा निर्णय घेतला़ त्यामुळे त्यांनी उसाची मोठ्या क्षेत्रावर लागवड केली आहे़उसाचे पाचट जाळले नाही साधारणत: शेतकरी ऊस काढणीनंतर उसाचे पाचट त्याच शेतात जाळतात. मात्र जैन यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार युरिया व पांढरा पोटॅश (म्युरेट आॅफ पोटॅश) यांचा शिडकावा करून त्याला पाणी सोडून ते पाचट सडविण्याचा प्रयत्न केला आहे़ तसेच यासाठी ते वेस्ट डिकंपोझर या जीवाणूंचाही विघटनासाठी वापर करीत आहेत.निर्मल सीड्स या पाचोरा येथील कंपनीने जैन यांच्या शेतात चार एकर क्षेत्रावर बियाण्याचा गहू म्हणून प्रयोगात्मक वाणाची लागवड केली आहे.तसेच निसर्गाचे देणे म्हणून प्रदीप जैन यांनी शेतातील रस्त्यांच्या दुतर्फा आंबा, आवळा, लिंबू, कडूलिंब, सीताफळ, जांभूळ, चिकू आदी फळ झाडांचीही लागवड केली आहे.गेल्यावर्षी नाला खोलीकरणाच्या झालेल्या कामामुळे यावर्षी पाणीटंचाई भासणार नाही इतके पाणी आहे. जलयुक्त शिवार योजनेत गावाचा समावेश करण्यासाठी आमदारांना ठराव दिलेला आहे़ या योजनेतून काम झाल्यास मुबलक प्रमाणात गावात पाणी उपलब्ध होईल़-मीनाबाई प्रभाकर हटकर, सरपंच पिंपळकोठा खुर्द.२०१५-१६ मध्ये पिंपळकोठा व पिंप्री खुर्द आणि बुद्रूक या चारही गावात पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर होती़ जलयुक्त शिवार योजना केवळ नावालाच चालली आहे. मात्र गेल्या वर्षी प्रदीप जैन यांनी नाला बांधचे आदर्श काम केले आहे़ याचा आदर्श ग्रामस्थांनी घेण्याची आवश्यकता आहे.- आर. डी.  पाटील, माजी सरपंच, पिंपळकोठा बुद्रूक़या गावात सतत पाण्याची टंचाई होती. मागील वर्षी संपूर्ण गावाला पाणी दिले. गेल्यावर्षीच नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण केले. याचा लाभ आम्हाला तर झालाच शिवाय परिसरातील विहिरीही तुडंूब भरल्या आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी भरपूर आहे. तसेच बागायत क्षेत्रातही वाढ झाली आहे. इतर गावातही असे प्रयोग मोठ्या प्रमाणावर राबविण्याची गरज आहे.- प्रदीप जैन, अध्यक्ष़, खान्देश जिनिंग असोसिएशन

टॅग्स :Jalgaonजळगाव