टपरी लावण्यावरून तुफान हाणामारी, ७० ते ७५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:19 IST2021-09-23T04:19:31+5:302021-09-23T04:19:31+5:30

आता गावात तणावपूर्ण शांतता आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. जखमींपैकी ...

70 to 75 people have been charged in connection with the storm | टपरी लावण्यावरून तुफान हाणामारी, ७० ते ७५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

टपरी लावण्यावरून तुफान हाणामारी, ७० ते ७५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

आता गावात तणावपूर्ण शांतता आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. जखमींपैकी दोन जणांना धुळे येथे तर एकाला चाळीसगाव येथे दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामदा येथील मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्याने बांधकाम विभागाने रस्त्यावर असलेल्या टपऱ्या हटविल्या होत्या. आता रस्त्याचे काम झाल्यानंतर या टपऱ्या आणि दुकाने मूळ जागेवर लावण्यावरून वाद झाला आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

आबा महाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून ७० जणांविरुद्ध तर दुसऱ्या गटातर्फे रेखा काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पाच लोकांविरुद्ध मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहेत.

Web Title: 70 to 75 people have been charged in connection with the storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.