मारहाण प्रकरणी 7 जणांना शिक्षा
By Admin | Updated: January 20, 2017 00:45 IST2017-01-20T00:45:22+5:302017-01-20T00:45:22+5:30
जळगाव : पूर्व वैमनस्यातून महिलेला मारहाण करुन शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी सात जणांना न्यायालयाने गुरुवारी वेगवेगळ्या कलमाखाली शिक्षा सुनावली

मारहाण प्रकरणी 7 जणांना शिक्षा
जळगाव : पूर्व वैमनस्यातून महिलेला मारहाण करुन शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी सात जणांना न्यायालयाने गुरुवारी वेगवेगळ्या कलमाखाली शिक्षा सुनावली तसेच फिर्यादी महिलेला नुकसान भरपाई म्हणून 15 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. शिक्षा सुनावलेल्यांमध्ये विलास नारायण सोनवणे, प्रल्हाद नारायण सोनवणे, जयदीप प्रल्हाद सोनवणे, रोहीत कैलास सोनवणे, कविता विलास सोनवणे, अलका प्रल्हाद सोनवणे व मनिषा सपकाळे (सर्व रा.शनी पेठ, जळगाव) यांचा समोवश आहे.
वैशाली दिनकर इंगळे यांना मारहाण करुन धमकी दिली होती. इंगळे यांच्या फिर्यादीवरुन 8 डिसेंबर 2013 रोजी शनी पेठ पोलीस स्टेशनला संशयितांविरुध्द कलम 143, 509, 323, 504 व 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे कामकाज न्या.प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात चालले.
सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य
यात सरकारतर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य धरुन न्यायालयाने सर्व संशयितांना वेगवेगळ्या कलमाखाली शिक्षा सुनावली. सरकारतर्फे अॅड.अनिल गायकवाड,अॅड.राजेश गवई तर आरोपीतर्फे अॅड.सागर चित्रे यांना काम पाहिले.