66 नगरसेवकांना ‘भोगवटय़ा’बाबत नोटिसा
By Admin | Updated: October 7, 2015 23:44 IST2015-10-07T23:44:48+5:302015-10-07T23:44:48+5:30
धुळे :आमदार गोटे यांनी केलेल्या तक्रारीवरून मनपाच्या 66 नगरसेवकांना बुधवारी नोटिसा बजावल्याची माहिती आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांनी दिली़

66 नगरसेवकांना ‘भोगवटय़ा’बाबत नोटिसा
धुळे : शहराचे आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या तक्रारीवरून मनपाच्या 66 नगरसेवकांना बुधवारी नोटिसा बजावल्याची माहिती आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांनी दिली़ विद्यमान नगरसेवकांपैकी एकाही नगरसेवकाने निवासी प्रमाणपत्र प्राप्त केले नसल्याने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे, तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 चे उल्लंघन केल्यामुळे महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 चे कलम 10च्या पोटकलम 1 (ड) मधील तरतुदीनुसार नगरसेवकपदी राहण्यास अपात्र ठरतात़ त्यानुषंगाने आपण सन 2003 च्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्जात नमूद केलेला पत्ता व निवडणुकीतील राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या राहण्याचे मिळकतीचे बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र सात दिवसात सादर करावे, असे नोटिसीत नमूद आह़े