शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टनमध्ये गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू; दुसऱ्याची मृत्युशी झुंज!
2
मुलींसाठी कमालीची आहे 'ही' स्कीम! केवळ व्याजातून होणार ₹४९ लाखांची कमाई, मॅच्युरिटीवर मिळतील ₹७२ लाखांचा फंड
3
VIDEO: दोस्तासाठी काहीपण... विराट कोहलीला हॉटेलवर सोडण्यासाठी खुद्द धोनीने चालवली कार
4
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
5
"मविआ फुटणार… लागलेली घरघर आता अखेरच्या टप्प्यात आलीये", भाजप नेत्याचा ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसवर बाण
6
आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५: संयम राखा आणि विचारपूर्वक व्यवहार करा!
7
VIDEO: धोनीच्या रांचीमधील आलिशन घरात जंगी पार्टी... विराट कोहली, ऋषभ पंतने लावली हजेरी
8
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
9
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
10
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
11
राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?
12
इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता ‘नो होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर
13
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."
14
सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली
15
गुंगीचे औषध देऊन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; स्ट्रगलिंग मॉडेलला अटक, २ साथीदारांचा शोध सुरू
16
श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला
17
‘गंभीर’ बट्ट्याबोळ वेळीच आवरा! भारतीय क्रिकेटची अशी पत घालवणे जास्त भयंकर अन् अक्षम्य
18
गर्जेच्या शरीरावरही जखमा, संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे; दाेन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी 
19
पोकळ बडबड करून भाजप, मोदींशी कसे लढता येईल?; कातडीबचाव आघाड्या दूर साराव्या लागतील
20
सत्तेसाठी कोण काय करेल, याचा काहीच नेम नाही; माजी राष्ट्राध्यक्षांना २७ वर्षांची शिक्षा, पण का?
Daily Top 2Weekly Top 5

सायकलवर ३८ तासात केले ६०० कि. मी. अंतर पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 21:51 IST

चाळीसगाव येथील ६० वर्षीय रवींद्र पाटील यांनी रोवले निशाण

जिजाबराव वाघ

चाळीसगाव : अवघ्या दोन वर्षापूर्वी त्यांचे सायकलच्या चाकांसोबत धावण्याचे सूर जुळले. वयाच्या ६० वर्षी त्यांनी ३८ तासात ६००किमी अंतर पार करण्याचे यशस्वी निशाण रोवले. सायकलवीरांच्या स्पर्धेतील एसआर किताबावर रवींद्र बारीकराव पाटील हे नाव कोरले गेले आहे. शनिवारी सायंकाळी त्यांनी स्पर्धा पूर्ण केली.रवींद्र पाटील हे येथील स्टेट बँकेंच्या कृषी शाखेत चालक पदावरुन सहा महिन्यांपूर्वी निवृत्त झाले. कोरोना काळात व्यायाम म्हणून त्यांनी सायकलला पायंडल मारले. दरवर्षी ते ३५ ते ४० किमी सायकलफेरी करतात.जिंतूर ते येडशी ६०० किमी अंतर पाररवींद्र पाटील यांनी २००, ३००, व ४०० किमी सायकल स्पर्धा यशस्वी केली आहे. एकाच कॕलेंडर वर्षात सलग अशा स्पर्धा पार करुन ६०० किमीची स्पर्धा पुर्ण केल्यानंतर सुपर राईडर अर्थात 'एसआर'चा सन्मान मिळतो.पाटील यांनी जिंतूर ते येडशी या ६०० किमी स्पर्धेसाठी २४ रोजी पहाटे चार वाजता सायकलला पायंडल मारले. डोक्यावर पावसाळी आभाळ घेऊन त्यांची सायकल सलग ३८ तास धावत होती. ६०० किमी अंतर ४० तास पार करायचे असतांना रवींद्र पाटील यांनी ते ३८ तासातच क्राॕस करीत एसआर सन्मानाला गवसणी घातली. सायंकाळी साडेसहा वाजता ते पुन्हा जिंतूरला पोहचले.1...रवींद्र पाटील यांनी जुलै महिन्यात इतर पाच सायकलस्वारांसोबतच चाळीसगाव ते पंढरपूर, अक्कलकोट - तुळजापूर अशी एक हजार २० किमी सायकलवारीही पूर्ण केली आहे.....शरिर तंदरुस्त ठेवायचे असले तर दरदिवशी सायकलिंग केली पाहिजे. सातत्य आणि सराव असल्यास वयाचे बंधन गळून पडते. मी वयाच्या ६० व्या वर्षी ६०० किमी सायकल प्रवासाची स्पर्धा यशस्वी केली. कोरोना काळात रोग प्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी रोज एक तास सायकल चालवावी. बरेच आजार दुर पळतील.- रवींद्र पाटीलएसआर सायकलस्वार, चाळीसगाव.

टॅग्स :bycycle rallyसायकल रॅलीChalisgaonचाळीसगाव