सायकलवर ३८ तासात केले ६०० कि. मी. अंतर पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 09:50 PM2021-09-25T21:50:47+5:302021-09-25T21:51:49+5:30

चाळीसगाव येथील ६० वर्षीय रवींद्र पाटील यांनी रोवले निशाण

600 km in 38 hours on a bicycle. I Cross the gap | सायकलवर ३८ तासात केले ६०० कि. मी. अंतर पार

सायकलवर ३८ तासात केले ६०० कि. मी. अंतर पार

Next



जिजाबराव वाघ


चाळीसगाव : अवघ्या दोन वर्षापूर्वी त्यांचे सायकलच्या चाकांसोबत धावण्याचे सूर जुळले. वयाच्या ६० वर्षी त्यांनी ३८ तासात ६००किमी अंतर पार करण्याचे यशस्वी निशाण रोवले. सायकलवीरांच्या स्पर्धेतील एसआर किताबावर रवींद्र बारीकराव पाटील हे नाव कोरले गेले आहे. शनिवारी सायंकाळी त्यांनी स्पर्धा पूर्ण केली.
रवींद्र पाटील हे येथील स्टेट बँकेंच्या कृषी शाखेत चालक पदावरुन सहा महिन्यांपूर्वी निवृत्त झाले. कोरोना काळात व्यायाम म्हणून त्यांनी सायकलला पायंडल मारले. दरवर्षी ते ३५ ते ४० किमी सायकलफेरी करतात.

जिंतूर ते येडशी ६०० किमी अंतर पार
रवींद्र पाटील यांनी २००, ३००, व ४०० किमी सायकल स्पर्धा यशस्वी केली आहे. एकाच कॕलेंडर वर्षात सलग अशा स्पर्धा पार करुन ६०० किमीची स्पर्धा पुर्ण केल्यानंतर सुपर राईडर अर्थात 'एसआर'चा सन्मान मिळतो.
पाटील यांनी जिंतूर ते येडशी या ६०० किमी स्पर्धेसाठी २४ रोजी पहाटे चार वाजता सायकलला पायंडल मारले. डोक्यावर पावसाळी आभाळ घेऊन त्यांची सायकल सलग ३८ तास धावत होती. ६०० किमी अंतर ४० तास पार करायचे असतांना रवींद्र पाटील यांनी ते ३८ तासातच क्राॕस करीत एसआर सन्मानाला गवसणी घातली. सायंकाळी साडेसहा वाजता ते पुन्हा जिंतूरला पोहचले.
1...रवींद्र पाटील यांनी जुलै महिन्यात इतर पाच सायकलस्वारांसोबतच चाळीसगाव ते पंढरपूर, अक्कलकोट - तुळजापूर अशी एक हजार २० किमी सायकलवारीही पूर्ण केली आहे.
....

शरिर तंदरुस्त ठेवायचे असले तर दरदिवशी सायकलिंग केली पाहिजे. सातत्य आणि सराव असल्यास वयाचे बंधन गळून पडते. मी वयाच्या ६० व्या वर्षी ६०० किमी सायकल प्रवासाची स्पर्धा यशस्वी केली. कोरोना काळात रोग प्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी रोज एक तास सायकल चालवावी. बरेच आजार दुर पळतील.
- रवींद्र पाटील
एसआर सायकलस्वार, चाळीसगाव.

Web Title: 600 km in 38 hours on a bicycle. I Cross the gap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.