दहा महिन्यात आढळले डेंग्यूचे 60 रुग्ण
By Admin | Updated: November 18, 2015 01:08 IST2015-11-18T01:08:26+5:302015-11-18T01:08:26+5:30
जिल्ह्यात डेंग्यूसदृश आजाराने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आह़े असे असताना मागील वर्षी 439 रुग्ण आढळले होत़े त्या तुलनेत यंदा ऑक्टोबरअखेर 60 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत़

दहा महिन्यात आढळले डेंग्यूचे 60 रुग्ण
धुळे : जिल्ह्यात डेंग्यूसदृश आजाराने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आह़े असे असताना मागील वर्षी 439 रुग्ण आढळले होत़े त्या तुलनेत यंदा ऑक्टोबरअखेर 60 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत़ आरोग्य यंत्रणेकडून तातडीने उपाययोजना आखल्या जात आहेत़ ग्रामस्थांनादेखील स्वच्छतेच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्ह्यातील मलेरिया विभागाकडून देण्यात आली़ दरम्यान, शहर आणि ग्रामीण मिळून या वर्षातील दहा महिन्यांच्या कालावधीत 284 संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होत़े गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध गावात डेंग्यूसदृश आजाराने त्रस्त असलेले रुग्ण समोर येत आहेत़ ग्रामपंचायत विभागासह आरोग्य विभागाकडून उपाययोजना होत असल्या, तरी अशी स्थिती असल्याने ग्रामस्थांना स्वच्छतेसह दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ मागील चार वर्षाची स्थिती डेंग्यूच्या आजाराने थैमान माजविले असल्याचे स्पष्ट होत असताना मागील चार वर्षाच्या स्थितीकडे लक्ष दिल्यास रुग्णांच्या संख्येत कधी वाढ तर कधी घट झाली असल्याचे दिसून येत़े 2011 मध्ये डेंग्यूसदृश आजाराने संशयित 17 रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होत़े त्यात दोन जणांना लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले होत़े त्यात एकास आपला प्राण गमवावा लागला होता़ 2012 मध्ये डेंग्यूसदृश आजाराने संशयित 360 रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होत़े त्यात 88 जणांना लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले होत़े नऊ जणांना योग्य उपचाराअभावी आपला प्राण गमवावा लागला होता़ 2013 मध्ये डेंग्यूसदृश आजाराने संशयित 355 रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होत़े त्यात 109 जणांना लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले होत़े दोन जणांना आपला प्राण गमवावा लागला होता़ 2014 मध्ये डेंग्यूसदृश आजाराने संशयित एक हजार 320 रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होत़े त्यात 439 जणांना लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले होत़े तीन जणांना आपला प्राण गमवावा लागला असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आह़े तशीच स्थिती जवळपास या वर्षातील असल्याचे म्हणावे लागेल़ दहा महिन्यांची स्थिती यंदा जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांची स्थिती लक्षात घेतल्यास 284 संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होत़े त्यातील 60 जणांना डेंग्यूची लागण लागल्याचे समोर आले आह़े या वर्षात आत्तार्पयत एकाही रुग्णाचा यात मृत्यू झालेला नाही़ तालुकानिहाय लेखाजोखा जानेवारी 2015 ते ऑक्टोबर 2015 या दहा महिन्यांची स्थिती तालुकानिहाय लक्षात घेतल्यास 189 संशयित रुग्ण आढळले आहेत़ त्यातील 38 जणांना डेंग्यूची लागण लागलेली आह़े त्यात धुळे तालुक्यात 77 संशयित डेंग्यूचे रुग्ण आढळल़े त्यातील 17 जणांना लागण लागली आह़े शिंदखेडा तालुक्यात 47 संशयित डेंग्यूचे रुग्ण आढळल़े त्यातील 8 जणांना लागण लागली आह़े शिरपूर तालुक्यात 38 संशयित डेंग्यू रुग्ण आढळल़े त्यात 4 जणांना लागण झाली आह़े साक्री तालुक्यात 27 संशयित डेंग्यूचे रुग्ण आढळल़े त्यातील 9 जणांना लागण लागली आह़े आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत़