25 टक्के प्रवेशाचे 54 लाख रखडले

By Admin | Updated: January 19, 2017 00:25 IST2017-01-19T00:25:08+5:302017-01-19T00:25:08+5:30

जळगाव : आर्थिक दुर्बल घटकांच्या पाल्यांना खाजगी संस्थांमध्ये नर्सरी व 1 लीमध्ये मोफत प्रवेश मिळावा यासाठी 25 टक्के मोफत प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

54 percent of the 25 percent entry passes | 25 टक्के प्रवेशाचे 54 लाख रखडले

25 टक्के प्रवेशाचे 54 लाख रखडले


जळगाव : आर्थिक दुर्बल घटकांच्या पाल्यांना खाजगी संस्थांमध्ये नर्सरी व 1 लीमध्ये मोफत प्रवेश मिळावा यासाठी 25 टक्के मोफत प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पण याबाबतचे 2015-16 व 2016-17 या दोन्ही वर्षाचे अनुदान रखडले आहे.
2015-16 या वर्षात 231 विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के प्रवेश प्रक्रियेतून 1162 विद्याथ्र्याना नर्सरी व 1 लीमध्ये मोफत प्रवेश मिळाला.
 या विद्याथ्र्याची प्रतिपूर्ती (खाजगी संस्थांना शुल्क वितरण) शासनातर्फे केली जाते. त्यांच्यासाठी प्रती विद्यार्थी किती शुल्क आकारावे यावरून वर्षभर शासन पातळीवर खल सुरू होता. संबंधित विद्याथ्र्याचे 54 लाख रुपये एवढे शुल्क शासनाकडून मंजूर झाले आहे, पण ते अजूनही मिळालेले नाही.
तर 2016-17 या शैक्षणिक वर्षात 240 शाळांमध्ये 1300 विद्याथ्र्याना 25 टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रवेश दिले.
विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित सीबीएसई पॅटर्नसाठीही जळगाव शहरातील काही संस्थांनी या प्रक्रियेतून नर्सरी व 1 लीमध्ये प्रवेश दिले.
अजून युनिट निश्चितीच नाही
2016-17 या वर्षातर्गत मोफत प्रवेश मिळालेल्या विद्याथ्र्याबाबत प्रती विद्यार्थी किती शुल्क आकारावे (युनिट निश्चिती) याबाबतचा निर्णय अजून शासनस्तरावर झालेला नाही. जि.प.च्या शिक्षण विभागातर्फे याबाबतचे प्रस्ताव, मागील वर्षातील प्रती पूर्तीची माहिती  शिक्षण संचालक, पुणे यांच्या कार्यालयात सादर करण्यात आली आहे.



संस्थाचालक अडचणीत, पुन्हा दबाव
या प्रक्रियेतून मोफत प्रवेश दिलेल्या संस्थांना यासंबंधीचे शुल्क न मिळाल्याने त्या अडचणीत सापडल्या आहेत. संस्थाचालकांना वर्षभरही या प्रक्रियेसंबंधीचे अनुदान किंवा पूर्तीपूर्ती होऊन मिळत नसल्याने काही संस्थांनी जि.प.च्या शिक्षण विभागाकडे पत्र सादर करून मागणी केली आहे. पण शिक्षण विभाग हा मुद्दा शासनस्तरावर प्रलंबित असल्याचे स्पष्टीकरण देत आहे. यातच पुढे 2017-18 च्या शैक्षणिक वर्षातही 25 टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत संस्थांना सूचना देण्यात आल्या आहे. या प्रक्रियेतून प्रवेश पात्र असतानाही नाकारले तर कायदेशीर कारवाईचा दम भरला जात आहे. अशात शिक्षण संस्थांची मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी अवस्था झाली आहे.


सर्व शिक्षा अभियानातून मिळणार अनुदान
25 टक्के प्रवेश प्रक्रियेत योगदान दिलेल्या संस्थांचे 2015-16 चे 54 लाख अनुदान मंजूर झाले. ते लवकरच प्राप्त होईल. तर 2016-17 च्या वर्षाचे अनुदान  सर्व शिक्षा अभियानांतर्गत मिळणार असल्याचे सर्व शिक्षा अभियानचे समन्वयक विवेक महाजनी म्हणाले.
 

Web Title: 54 percent of the 25 percent entry passes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.