५२ रुग्ण ऑक्सिजनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:17 IST2021-01-03T04:17:25+5:302021-01-03T04:17:25+5:30

टँकची तपासणी जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील लिक्विड ऑक्सिजन टँकची पाइपलाइन पूर्ण झाल्यानंतर लिक्विड टाकून ऑक्सिजन पुरवठ्याची ...

52 patients on oxygen | ५२ रुग्ण ऑक्सिजनवर

५२ रुग्ण ऑक्सिजनवर

टँकची तपासणी

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील लिक्विड ऑक्सिजन टँकची पाइपलाइन पूर्ण झाल्यानंतर लिक्विड टाकून ऑक्सिजन पुरवठ्याची तपासणी करण्यात आली. काही ठिकाणी पाइपलान खराब असल्याने ती दुरुस्त करण्यात आली आहे.

तपासणी सुरूच

जळगाव : शहरातील फुले मार्केटमध्ये व्यापाऱ्यांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून, मंगळवारपासून ही तपासणी सुरू आहे. अद्याप एकही बाधित या मोहिमेत समोर न आल्याने दिलासा मिळाला आहे. तीन हजारांवर व्यापारी, दुकानदारांची तपासणी करण्याचे नियोजन आहे.

स्ट्रेन कोरोनावर मंथन

जळगाव : जिल्ह्यात विदेशातून काही नागरिक परतले असून त्यात ब्रिटनहून आलेल्या नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे स्ट्रेन कोरोनाबात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्राध्यापक डॉक्टरांमध्ये नियमित मंथन सुरू असून, बैठकांमधून नियोजन केले जात आहे.

Web Title: 52 patients on oxygen