जिल्ह्यात ५० नवे बाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:46 IST2021-01-08T04:46:29+5:302021-01-08T04:46:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे ५० बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात शहरातील ३१ रुग्णांचा समावेश ...

जिल्ह्यात ५० नवे बाधित रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे ५० बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात शहरातील ३१ रुग्णांचा समावेश असून गेल्या काही दिवसांपासून शहरात मोठी रुग्णवाढ नोंदविली जात असल्याने काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, शहरातील एका बाधितासह दोन बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मंगळवारी ९६८ अहवाल आले त्यात ५० बाधित आढळून आले आहेत. ॲन्टीजन चाचण्यांचे प्रमाण घटविण्यात आल्याचे चित्र आहे. दरम्यान, नवे रुग्ण अधिक आणि बरे होणारे कमी हे चित्र पुन्हा एकदा समोर आल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पुन्हा काही अंशानी कमी झाले आहे.
शहरात चिंता
शहरात गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढ समोर येत असून मंगळवारी ३१ रुग्ण आढळून आले आहेत. कालही वीस पेक्षा अधिक रुग्ण समोर आले होते. शहरातील सर्वच भागात एक एक रुग्ण समोर येत असल्याने कोरोनाची भीती कायम असल्याचे चित्र आहे. दरम्यान, शहरातील ६४ वर्षीय पुरूष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शहरातील रुग्णसंख्या १२५८७ वर पोहोचली आहे. मृत्यू २८८ झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या २०० पेक्षा अधिक झाली असून २३२ रुग्ण उपचार घेत आहेत.