शहरात ५ नवीन रुग्ण, ६ जण झाले बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:21 IST2021-07-07T04:21:37+5:302021-07-07T04:21:37+5:30
लोकमत न्यूज नेवटर्क जळगाव : मंगळवारी शहरात ५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली, तर ६ रुग्ण बरे झाले आहेत. ...

शहरात ५ नवीन रुग्ण, ६ जण झाले बरे
लोकमत न्यूज नेवटर्क
जळगाव : मंगळवारी शहरात ५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली, तर ६ रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून एकही मृत्यू नसल्याची दिलासादायक स्थिती ही मंगळवारीही कायम होती. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ही ४३ वर पोहोचली असून, मृत्युदर घटून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
रविवार-सोमवारच्या तुलनेत मंगळवारी काही प्रमाणात रुग्णवाढ समोर आली आहे. आरटीपीसीआरच्या ८४० अहवालांमध्ये ७ बाधित आढळून आले आहेत, तर अँटिजनच्या २,०३० अहवालांमध्ये १२ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात केवळ तीन तालुक्यांमध्ये रुग्ण आढळून आले असून, अन्य १२ तालुक्यांमध्ये मंगळवारी एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. भडगाव, बोदवड व मुक्ताईनगर या तालुक्यांमध्ये दहापेक्षाही कमी सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्णांची स्थिती
सक्रिय रुग्ण ३६६
लक्षणे असलेले रुग्ण २२९
लक्षणे नसलेले रुग्ण १३७
आयसीयूत दाखल ४२
होम आयसोलेशन १२६