पाच लाखांसाठी जळगावात विवाहितेचा छळ
By Admin | Updated: June 26, 2017 17:01 IST2017-06-26T17:01:57+5:302017-06-26T17:01:57+5:30
जळगाव येथील सासर आणि नंदुरबार शहरातील माहेर असलेल्या विवाहितेने माहेरून पाच लाख आणावेत यासाठी छळ करणा:या सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

पाच लाखांसाठी जळगावात विवाहितेचा छळ
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.26 - जळगाव येथील सासर आणि नंदुरबार शहरातील माहेर असलेल्या विवाहितेने माहेरून पाच लाख आणावेत यासाठी छळ करणा:या सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
लहान हुडको कॉलनीतील प्लॉट क्रमांक पाच येथील माहेर असलेल्या भारती बिरारी यांचा विवाह किशोर गोकूळ बिरारी यांच्यासोबत झाला होता़ किशोर हा नोकरीला असल्याचे सांगत हा विवाह करण्यात आल्याचे विवाहितेचे म्हणणे आह़े
विवाहानंतर 13 फेब्रुवारी ते 23 जून या दरम्यान पती किशोर सासू उषाबाई बिरारी, सासरे गोकूळ श्रावण बिरारी, जितेंद्र गोकूळ बिरारी, मनिषा योगेश बोरसे, योगेश भिकाजी बोरसे, रमेश गंगाराम देसले, किसन गंगाराम देसले, प्रकाश ओंकार पाटील सर्व रा़ पिंप्राहाट ता़ जि़ जळगाव यांनी माहेरून पाच लाख रूपये आणावेत यासाठी छळ केला़ याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात फिर्यादीवरून नऊ संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल आह़े