ब्राह्मणे येथे मातीची भिंत कोसळून २ मुले ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 21:15 IST2019-08-01T21:15:05+5:302019-08-01T21:15:12+5:30

अमळनेर : ग्रामस्थांमुळे वाचले आईवडिलांचे प्राण

 5 children killed in brahmin collapse | ब्राह्मणे येथे मातीची भिंत कोसळून २ मुले ठार

ब्राह्मणे येथे मातीची भिंत कोसळून २ मुले ठार


अमळनेर : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने सुरू असलेल्या झिमझीम पावसाने तालुक्यातील बाह्मणे येथील मातीचे घर भिजून त्याची भिंत शेजारील पत्र्याच्या शेडवर पडली. त्याखाली कुटुंब दबले गेले. ग्रामस्थांच्या मदतीमुळे आईवडीलांचे प्रण वाचू शकले. मात्र मातीखाली दबलेली २ मुले जागीच ठार झाली. ही घटना १ आॅगस्ट रोजी मध्यरात्री घडली.
गेल्या चार दिवसांपासून शहर व परिसरात सुरू असलल्या पावसामुळे नागरिकांना सूर्याचे दर्शन झालेले नाही. रिमझिम पाऊस सुरू असल्याने जुनी मातीची घरे पूर्णपणे आली होऊन जड झाली आहेत.
ब्राह्मणे येथे शेतमजुरी करणारे पुना सदा पावरा हा पत्नी शांताबाई, तसेच मुले जितेश (वय ७) व राहुल (५) यांच्यासह पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते. शेजारील घराची मातीची भिंत कोसळल्याने त्यांचे कुटुंब त्याखाली दबले गेले. कुटुंबीयांची आरडाओरड ग्रामस्थांना ऐकू आल्यानंतर धर्मराज पाटील, महेश पाटील, राजेंद्र पाटील, सरपंच प्रवीण पाटील, नितीन पाटील, संतोष पाटील, गुणवंत पाटील, प्रतीक पाटील, प्रकाश पाटील, नवल पाटील, किशोर पाटील यांनी त्यांना बाहेर काढायला सुरुवात केली. मिळेल त्या साहित्याने आई-वडिलांना सुखरूप बाहेर काढण्यात त्यांना यश आले. मात्र मलब्यामुळे गुदमरून दोन्ही मुलांचा मृत्य झाला. त्यांना प्रथम बेटावद येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र सुविधा नसल्याने जखमींना उपचारासाठी व मुलांचे शव विच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

Web Title:  5 children killed in brahmin collapse