शहरातील ४८०० खांब लाईटविनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:13 IST2021-06-18T04:13:15+5:302021-06-18T04:13:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात एस्को तत्वावर एलईडी लावण्याचे काम सुरू असून, संबंधित ठेकेदाराला हे काम तीन महिन्यांत ...

शहरातील ४८०० खांब लाईटविनाच
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात एस्को तत्वावर एलईडी लावण्याचे काम सुरू असून, संबंधित ठेकेदाराला हे काम तीन महिन्यांत बसविण्याची मुदत होती; मात्र तीन महिने होऊनदेखील शहरातील ४८०० खांब एलईडीविनाच असल्याने गुरुवारी महापौर जयश्री महाजन यांनी एलईडी बसविण्याचे काम घेतलेल्या ‘ईईएसएल’ कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
शहरात एलईडी बसविण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. ज्याठिकाणी एलईडी बसविण्यात आले आहेत. त्याठिकाणचे एलईडीदेखील बंद पडले आहेत. याबाबत मनपा प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्यामुळे गुरुवारी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी एलईडी बसविण्याच्या कामाचा आढावा घेतला. या बैठकीत मनपाच्या विद्युत विभागासह ‘ईईएसएल’, ‘महावितरण’ व ‘ईईएसएल’ने नियुक्त केलेले वेंडर उपस्थित होते. या बैठकीत महापौरांनी ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून काही विषय मार्गी लावण्याची भूमिका मांडली गेली, तर ‘ईईएसएल’च्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत शहरातील ज्या खांबांवर लाईट नाही तेथे तत्काळ एलईडी लाईट लावावेत. ३० जूनपर्यंत शहरात एलईडी लावण्याचे काम पूर्ण करा, अशा सूचना महापौरांनी दिल्या.