चाळीसगाव येथे 47 हजाराची दारु जप्त
By Admin | Updated: June 1, 2017 17:13 IST2017-06-01T17:13:06+5:302017-06-01T17:13:06+5:30
भडगाव रोडवरील पूर्णपात्रे लॉन्सजवळ 407 वाहनातून 47 हजार 424 रुपयांच्या अवैध दारुच्या बाटल्या अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने जप्त केल्या.

चाळीसगाव येथे 47 हजाराची दारु जप्त
ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव,दि.1 - भडगाव रोडवरील पूर्णपात्रे लॉन्सजवळ 407 वाहनातून 47 हजार 424 रुपयांच्या अवैध दारुच्या बाटल्या अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने जप्त केल्या. ही कारवाई 31 रोजी रात्री करण्यात आली.
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटरच्या आत दारु विक्री बंदीचा न्यायालयाचा आदेश असताना शहर व परिसरात देशी-विदेशी दारु विक्री होत आहे. अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन याच कार्यालयातील पोहेकाँ संतोष राघो पाटील व पोकाँ नितीन साहेबराव आगोणे यांनी पूर्णपात्रे लॉन्सजवळ सापळा रचला. रस्त्यावर उभे असलेले 407 वाहनाची तपासणी केली असता त्यात देशी दारुचे 19 बॉक्ससह विदेशी दारुचे खोके आढळले. 42 हजार 424 रुपयाची दारु व टाटा कंपनीचे 407 वाहन असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोहेकाँ संजय पाटील यांच्या खबरीवरुन सुशील युवराज येवले, संजय युवराज येवले (दोघे रा. आचलगाव ता.भडगाव ) यांचेविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.