भुसावळला 45 हजारांचे विदेशी मद्य जप्त
By Admin | Updated: May 13, 2017 18:06 IST2017-05-13T18:06:59+5:302017-05-13T18:06:59+5:30
आशिया महामार्गावर भुसावळनजीक एका हॉटेलमध्ये पहाटेच्या सुमारास पोलीस पथकाने कारवाई

भुसावळला 45 हजारांचे विदेशी मद्य जप्त
ऑनलाइन लोकमत
भुसावळ, जि. जळगाव, दि. 13 - आशिया महामार्गावर भुसावळनजीक एका हॉटेलमध्ये पहाटेच्या सुमारास पोलीस पथकाने कारवाई करून 44 हजार 947 रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली़ या कारवाईने शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आह़े या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल सुनील थोरात यांनी फिर्याद दिल्यावरून संशयीत आरोपी अशपाक हिरा गवळी व अजहर रफीक गवळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़