४५ शेळ्यांना चोरणारे त्रिकूट गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 02:15 IST2019-02-02T02:12:02+5:302019-02-02T02:15:14+5:30

शहरातून ४५ शेळ्या दुचाकीद्वारे चोरणाऱ्या त्रिकुटाला पोलिसांनी गजाआड करण्यात यश मिळविले आहे.

 45 thieves steal the thieves | ४५ शेळ्यांना चोरणारे त्रिकूट गजाआड

४५ शेळ्यांना चोरणारे त्रिकूट गजाआड

ठळक मुद्देआरोपींना पोलीस कोठडी मिळाली आहे.



रावेर : शहरातून ४५ शेळ्या दुचाकीद्वारे चोरणाºया त्रिकुटाला पोलिसांनी गजाआड करण्यात यश मिळविले आहे. नाविद उर्फ नावा शेख रा. खाटीकवाडा, रावेर, नासिर शेख निसार रा. खिर्डी ता रावेर, साबीर रफिक खाटीक रा ईस्लामपूरा, सावदा
अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी शहरातील ईदगाह रोडलगतच्या तीन रहिवाशांच्या २९ हजार रुपये किमतीच्या शेळ्या २९ जानेवारी रोजी लंपास केल्याचा संशय आहे. पो. नि रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्यांना गजाआड केले असून, त्यांनी आणखी ७३ हजार रुपये किमतीचे ३६ बकºया व बोकड लांबवल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींना पोलीस कोठडी मिळाली आहे.

Web Title:  45 thieves steal the thieves