शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

अलिशान कारमधून जाणारा ४४ लाखाचा गांजा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 12:34 IST

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री भडगाव-चाळीसगाव रस्त्यावर ओझर गावाजवळ पाठलाग करुन ४४ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा गांजा, २६ लाख रुपये किमतीच्या दोन अलिशान कार व दोन लाखाचे मोबाईल असा ७० लाख ७० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे एलसीबीची चाळीसगावात कारवाई  दोन वाहनांसह तिघांना अटक ७० लाखाचा ऐवज जप्त

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री भडगाव-चाळीसगाव रस्त्यावर ओझर गावाजवळ पाठलाग करुन ४४ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा गांजा, २६ लाख रुपये किमतीच्या दोन अलिशान कार व दोन लाखाचे मोबाईल असा ७० लाख ७० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात शुभम किरण राणा (वय २२), भूषण केशव पवार (वय ३२) दोन्ही रा.डाळवाली खळे, चाळीसगाव व रवींद्र गुलाबराव शिंदे (वय ५३, रा.जुना सातारा कडू प्लॉट, भुसावळ) या तिघांना अटक करण्यात आली असून अन्य चार जण फरार झाले आहेत. अटकेतील तिघांविरुध्द चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अमंली पदार्थाची तस्करी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईसाठी ठिकठिकाणी नेमले पथकअकोला येथून दोन अलिशान कारमधून (क्र.एम.एच.१४ ए.एन.६५३२ व एम.एच.१५ जी.एल.१७६१) चाळीसगाव शहरात गांजा येत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांना मिळाली होती. त्यानुसार रोहोम यांनी त्यांचे सहकारी रामकृष्ण पाटील व महेश पाटील यांना खात्री करुन पुढील कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. अकोला येथून कार निघून त्या मध्यरात्री दोन वाजेपर्यंत चाळीसगावात पोहचणार असल्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर रोहोम यांनी सहायक निरीक्षक रवींद्र बागुल, महेश जानकर, रामचंद्र बोरसे, संजय सपकाळे, रामकृष्ण पाटील, महेश पाटील, विनयकुमार देसले, रवींद्र भगवान पाटील, किरण चौधरी, दत्तात्रय बडगुजर, योगेश वराडे, अशरफ शेख, इद्रीसखान पठाण यांचे पथक तयार केले तर विजय पाटील व नरेंद्र वारुळे हे तांत्रिक माहिती मिळवून पथकाला देत होते. या कर्मचाºयांची विभागणी करुन ठिकठिकाणी पथके नेमण्यात आली होती. ओझर गावाजवळ ही कारवाई यशस्वी झाली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव