आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १७ : शासनाच्या वन विभागातर्फे पर्यावरण संर्वधनासाठी दरवर्षी वृक्ष लागवड करण्यात येते. त्याअंतर्गत शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक ३ हजार ३७५ शाळांमध्ये ४३ हजार ८७५ वृक्ष लागवड केली जाणार आहे.मागील वर्षी संपूर्ण राज्यात ४ कोटी वृक्ष लागवड करण्यात आले होते. आगामी २०१८-१९ या वर्षात १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांमध्ये ४३ हजार ८७५ वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. जून महिन्यात पावसाळा सुरु झाल्यानंतर वृक्ष लागवडीस सुरुवात केली जाणार आहे़तत्पूर्वी शाळांमध्ये खड्डे तयार केले आहेत की नाही़ यासह वृक्ष लागवडीसाठी जागा उपलब्ध आहे का? याबाबत प्रत्येक गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून माहिती मागविण्यात आली आहे़ही माहिती दोन दिवसात देण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. तर प्रत्येक शाळेत १३ वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील ३३७५ शाळांमध्ये होणार ४३ हजार ८७५ वृक्ष लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 22:08 IST
जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक ३ हजार ३७५ शाळांमध्ये ४३ हजार ८७५ वृक्ष लागवड केली जाणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील ३३७५ शाळांमध्ये होणार ४३ हजार ८७५ वृक्ष लागवड
ठळक मुद्देप्रत्येक शाळेत १३ वृक्ष लागवडीचे उद्दीष्टजून महिन्यात पावसाळा सुरु झाल्यानंतर वृक्ष लागवडीस सुरुवात३ हजार ३७५ शाळांमध्ये ४३ हजार ८७५ वृक्ष लागवड