शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

चक्रीवादळ व गारपिटीच्या तडाख्यात केळीचे ४२.४० लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 16:45 IST

रावेर , जि.जळगाव : रोहिणी नक्षत्रातील वादळी पावसाने शुक्रवारी सायंकाळी चक्रीवादळासह गारपिटीचा तडाखा दिल्याने तालुक्यातील १०८ शेतकऱ्यांचे तब्बल चार ...

ठळक मुद्देखासदार रक्षा खडसे यांनी केली आपद्ग्रस्त केळी बागांची पाहणीआठवड्यात दुसऱ्यांदा झाले वादळ

रावेर, जि.जळगाव : रोहिणी नक्षत्रातील वादळी पावसाने शुक्रवारी सायंकाळी चक्रीवादळासह गारपिटीचा तडाखा दिल्याने तालुक्यातील १०८ शेतकऱ्यांचे तब्बल चार महिन्यांच्या असह्य तापमानात काहूर झालेल्या १०६ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा जमीनदोस्त झाल्या होत्या. ४२ लाख ४० हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज तालुका प्रशासनाने आपल्या प्राथमिक अहवालात वर्तवला आहे. दरम्यान, आज खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जि.प.सदस्य कैलास सरोदे, शिवाजीराव पाटील, तहसीलदार अभिलाषा देवगुणे व तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी बाधित क्षेत्राची पाहणी केली.रावेर तालुक्यातील १ जून रोजी वादळी पावसाने नुकसान झालेल्या केळी बागांचे पंचनामे पूर्णत्वास येत नाहीत तोच, रोहिणी नक्षत्रातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी वादळी पावसासह गारपिटीच्या रावेर शहरासह तालूक्यातील लुमखेडा, उदळी, सावदा, कोचूर, खिरोदा प्र.यावल, बोरखेडा, तामसवाडी, पुनखेडा, पातोंडी परिसरात जबर तडाखा बसला होता.रावेर शहरात मोठ मोठी झाडे व झाडांचे फांद्या वीजखांबांसह वीजतारांवर पडून रावेर शहरासह खानापूर व मोरगाव वीज उपकेंद्रातील १५ गावे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अंधारात बुडाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.या वादळी तडाख्याने शहरातील सुनील रायपूरकर, राजेश पांडे, अशोक भावसार, सतिश भावसार बाविस्कर यांच्या घरांवरील टीनपत्र्याचे छत उडून तर अंशत: पडझड होऊन २७ हजार रुपये चे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी डी व्ही कांबळे यांनी केला आहे.

टॅग्स :RainपाऊसRaverरावेर