४00 थकबाकीदार सोसायट्या

By Admin | Updated: January 30, 2015 14:59 IST2015-01-30T14:59:07+5:302015-01-30T14:59:07+5:30

मागील आर्थिक वर्षात कर्जाची परतफेड न करणार्‍या जिल्हाभरातील सुमारे ४00 विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या संचालकांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदानापासून वंचित रहावे लागेल, अशी शक्यता आहे.

400 Soldier Societies | ४00 थकबाकीदार सोसायट्या

४00 थकबाकीदार सोसायट्या

 जळगाव : मागील आर्थिक वर्षात कर्जाची परतफेड न करणार्‍या जिल्हाभरातील सुमारे ४00 विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या संचालकांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदानापासून वंचित रहावे लागेल, अशी शक्यता आहे. 
३१ मार्च २0१४ ला कर्जफेड न करणार्‍या सोसायट्यांची संख्या ४00 पर्यंत आहे. यातच नियमानुसार थकबाकीदार सोसायट्यांचे संचालक किंवा थकबाकीदार संचालक मतदान करू शकणार नाही. 
नियमित कर्ज भरणारा सभासद करू शकतो मतदान
थकबाकीदार संचालक मतदान करू शकणार नसले तरी संबंधित सोसायटीमधील नियमित कर्ज भरणारे सभासद मतदान करू शकतील. पण त्यासाठी संबंधित थकबाकीदार सोसायटीच्या पंचमंडळाला किंवा सभेला नियमित कर्ज भरणार्‍या सोसायटीच्या सभासदाच्या नावाचा मतदान करण्यासाठी ठराव करावा लागेल. यानंतर हा ठराव जिल्हा उपनिबंधक कार्यालयास सादर करता येईल. 
निम्मे सोसायट्या थकबाकीदार
जिल्हाभरात ८७७ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या आहेत. पैकी जवळपास निम्मे सोसायट्यांमधील संचालक थकबाकीदार असल्याने या सोसायट्यांच्या संचालकांना घोडेबाजाराचा लाभ होणार नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. 
ठराव थेटही पाठविता येणार
विविध सहकारी सोसायट्यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंबंधी ठराव पाठविण्याचे पत्र पाठविले आहेत. पण पत्र नाही मिळाले तरी मतदानास पात्र असलेल्या संबंधित सोसायटीचे संचालक मतदानासंबंधीचा ठराव करून तो जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर करू शकतील. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे अजून सोसायट्यांचे ठराव सादर झालेले नाहीत. परंतु सोसायट्यांमध्ये ठराव सादर करण्याची लगबग दिसून येत आहे. येत्या एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत जिल्हा बँकेची निवडणूक घेण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.

Web Title: 400 Soldier Societies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.