शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील ४०० सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ‘रडार’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 18:56 IST

पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची माहिती

ठळक मुद्देगणेशोत्सवासाठी पोलीस दलाची तयारीगणेश मंडळांना पोलीस दलातर्फे विघ्नहर्ता पुरस्कार देणार

जळगाव : जिल्ह्यातील गुन्हेगारी, चोरी व घरफोडीच्या घटनांना नियंत्रणात आणण्यासाठी नियमित सराईत गुन्हेगार वगळता जिल्ह्यात तब्बल नवीन ४०० सराईत गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. महिनाभरात त्यांच्यावर कारवाई झालेली असेल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली. दरम्यान, पोलीस दलातर्फे विघ्नहर्ता पुरस्कार योजना सुरु करण्यात आलेली असून गणेशोत्सवात गणेश मंडळांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.जिल्हा पोलीस अधीक्षकपदी जळगावात रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच दत्तात्रय शिंदे यांनी मंगळवारी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुळकर्णी व वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रवीण चोपडा यांनी त्यांचे स्वागत केले. आगामी गणेशोत्सव तसेच पोलीस दलातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली. त्यांच्याशी झालेला संवाद प्रश्नोत्तर स्वरुपात असागणेशोत्सवासाठी पोलीस दलाची तयारीहा उत्सव शांततेत व आनंदात पार पाडावा यासाठी पोलीस दल सज्ज आहे. धार्मिक उत्सवात जातीय सलोखा योजना कार्यान्वित केली आहे. त्यात विधायक कामे, उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. समाजाभिमुख काम करणाºयांना शाबासकी मिळावी यासाठी गणेश मंडळांना बक्षीस दिले जाणार आहे. त्यासाठी मूल्यमापन समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती गुणांकन करुन उत्कृष्ट मंडळाची निवड करेल. पोलीस स्टेशन स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय असे बक्षीस दिले जाणार आहे. तर जिल्हा स्तरावरही तीन बक्षीसे दिली जातील, असेही शिंदे यांनी सांगितले.चोºया व घरफोड्या रोखण्यासाठी गुन्हेगारांवर ‘नजर’दत्तात्रय शिंदे म्हणाले, जिल्ह्याची जनता शांतताप्रिय आहे. या जिल्ह्यात काम करायला खूप वाव आहे. विशिष्ट पध्दतीचे गुन्हे वाढले आहेत. दुचाकी चोर व घरफोडी या घटनांना रोखण्यासाठी गुन्हेगारांच्या हालचाली टिपणे, रात्रीच्या गस्तीत सराईत गुन्हेगार तपासले जाणार आहेत.काही जण व्यवसाय पध्दतीची गुन्हेगारी करतात. ते कधीच रेकॉर्डवर आलेले नाहीत, अशा ४०० जणांची यादी तयार झाली आहे, त्यांच्यावर महिनाभरात कारवाई करु. नाकाबंदी, वाहनांची तपासणी यातून रस्त्यावरची सुरक्षा सांभाळली जाते.

टॅग्स :PoliceपोलिसJalgaonजळगाव