बोरी नदी पात्रात बुडून २ तरुणांचा मृत्यू, एक बालक अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 16:44 IST2019-09-17T16:44:12+5:302019-09-17T16:44:17+5:30
मंगळवार ठरला अमळनेर तालुक्यासाठी ‘अपघात’वार

बोरी नदी पात्रात बुडून २ तरुणांचा मृत्यू, एक बालक अपघातात ठार
अमळनेर : मंगळवार हा अमळनेर तालुक्यासाठी अपघातवार ठरला असून बोरी नदी पात्रात २ तरुणांचा बुडून मृत्यू झाला. तर पारोळा रस्त्यावर वाहनांच्या अपघातात एक बालक जागीच ठार होऊन तीन जण जखमी झाले. ढेकू रोडवर लोंबकळणा-या तारांमुळे शॉट सर्किट होऊन एक जण ६० टक्के भाजला आहे. तसेच २० मीटर स्फोट होऊन जळाले आहेत.
तामसवाडी धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने बोरी नदी दुथडी भरून वाहत आहे. दानिश शेख अरमान (वय १६) व शाहीदखा रेहमानखा (वय १६) रा. कसली मोहल्ला हे पाण्यात बुडून मरण पावले. तर मोटरसायकलला चारचाकीची धडक लागल्याने अमोल इरा पावरा हा बालक जागीच ठार झाला. यात रेखा पवार व जनाबाई पावरा जखमी झाल्या आहेत. ढेकू रोडवर शॉट सर्किटमळे दिनेश परशुराम भिल याला शॉक लागून तो ६० टक्के भाजला तसेच २० मीटर बॉक्स स्फोट होऊन फुटले.