२१ वर्षीय महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 22:15 IST2019-12-11T22:15:50+5:302019-12-11T22:15:59+5:30
भडगाव : तालुक्यातील पिचर्डे येथे २१ वर्षीय महिलेचा विहिरीत पडून पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना ११ रोजी दुपारी १२ ...

२१ वर्षीय महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू
भडगाव : तालुक्यातील पिचर्डे येथे २१ वर्षीय महिलेचा विहिरीत पडून पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना ११ रोजी दुपारी १२ वाजेपूर्वी पिचर्डे शिवारात घडली. याबाबत भडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस पाटील हेमराज पाटील यांनी दिलेल्या खबरीनुसार, पिचर्डे शिवारात बापू जावरे यांच्या शेतातील विहिरीत संगीता नाना भिल (वय २१) ही महीला विहिरीत पडलेली दिसली. त्यांनी तत्काळ ग्रामस्थांच्या मदतीने मयत संगीता हीस विहिरीतून बाहेर काढले.
उपचारासाठी भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ पांडुुरंग सोनवणे करीत आहेत. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.